न्यायिक वृत्त
धनादेश वटला नाही,आरोपी निर्दोष सुटला !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
एका व्यवहारात दिलेला धनादेश वाटला नाही या कारणावरून फिर्यादी अनिल चतुरे यांनी आरोपी जीवन धर्माधिकारी याचे विरुध्द दाखल झालेल्या दाव्यात राहाता येथील प्रथम वर्ग १ या न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली असल्याची माहिती ऍड.विकास डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

फिर्यादी धनादेशाचे दुरुपयोग करून खोटे प्रकरण दाखल केले आहे.याबाबत आरोपीच्या वतीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले देण्यात आले होते.यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.एस.व्हि.खैरे यांनी आरोपी जीवन धर्माधिकारी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
एखाद्या व्यवहारात धनादेश न वटल्यास पैसे देणारी बँक लगेचच ज्याला पैसे मिळणार आहेत त्या व्यक्तीच्या बँकेला “चेक रिटर्न मेमो” पाठवते,त्यामध्ये पैसे न देण्याचे कारण सांगितलेले असते.त्यानंतर ती बँक आपल्या खातेदाराला परत आलेला चेक आणि तो मेमो सुपूर्द करते.पैसे मिळणाऱ्या व्यक्तीला जर खात्री असेल की बँकेत परत चेक जमा केल्यास तो वटू होऊ शकतो,तर त्या व्यक्तीने चेकवरील तारखेपासून तीन महिन्यांच्या आत तो चेक बँकेत जमा करावा.परंतु तो चेक दुसऱ्यांदा वटला नाही तर मात्र ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत ती व्यक्ती चेक देणाऱ्या समोरच्या व्यक्तीवर कायदेशीर खटला दाखल करू शकते.चेक बाउंस होण्याच्या संबंधित प्रकरणांची चौकशी ‘द निगोशिअब्ल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट’ -१८८१ च्या अंतर्गत केली जाते.१८८१ च्या नंतर ह्या अधिनियमामध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत.या अधिनियमाच्या कलम १३८ नुसार चेक बाउंस होणे हा एक दंडनीय अपराध आहे आणि त्यासाठी दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्हीही होऊ शकते.
याबाबत अशीच एक घटनेचा दावा नगर जिल्ह्यातील राहाता येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांचे समोर दाखल झाला होता.त्यात फिर्यादी म्हणून अनिल चतुरे यांनी हा दावा दाखल केला होता.तर आरोपी जीवन धर्माधिकारी हे होते.त्यांच्या वतीने राहाता येथील ऍड.विकास डांगे यांनी काम पाहिले आहे.ऍड.डांगे यांनी फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील व्यवहार खरा नाही.फिर्यादी धनादेशाचे दुरुपयोग करून खोटे प्रकरण दाखल केले आहे.याबाबत आरोपीच्या वतीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले देण्यात आले होते.यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.एस.व्हि.खैरे यांनी आरोपी जीवन धर्माधिकारी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.दरम्यान या दाव्यात ऍड.डांगे यांना ऍड.व्यंकटेश ख्रिस्ते व ऍड.महेश्वर थोरात यांनी सहाय्य केले आहे.मात्र यात हा दावा कोणत्या व्यवहाराचा होता हे नमूद केलेले नाही.