न्यायिक वृत्त
…..’त्या’ जबरी गुन्ह्यातील आरोपी जेरबंद,दोन फरार,०८ दिवसांची कोठडी

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच कंपनीत दि.१९ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास सुमारे विविध किंमती घड्याळासह ३० लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीचा नगर येथील गुन्हे शाखेने तपास लावला असून यातील १० आरोपींपैकी ०८ आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती मिळाली असून त्यांना आज कोपरगाव येथील प्रथमवर्ग वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता त्यांना ०८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे पोलिसांनी अकरा दिवसांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर मधून या टोळीला जेरबंद केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.

जबरी चोरीतील गुन्हेगार हे बिहार मधील घोडासहन,तालुक-घोडासहन,जिल्हा मोतीहारी येथील आढळून आले होते.त्यांचा माग काढून पोलिसांनी त्या १० चोरट्या पैकी ०८ चोरट्यांना जेरबंद केले आहे.त्यात सुरेंदर जयमंगल दास (वय-४०),रियाज नईम अन्सारी वय-४०),पप्पू बिंदा गोस्वामी (वय-४४),राजकुमार चंदन साह (वय-४४)राजकुमार विरा प्रसाद (वय-४५),नईम मुन्ना देवान (वय-३०),राहुल कुमार किशोरी प्रसाद (वय-२६),गुलशन कुमार ब्रम्हानंद प्रसाद (वय-२५).आदींच्या मुसक्या आवळल्या आहेत.यातील दोन जण अद्याप फरार आहेत.

दरम्यान सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आदल्या दिवशी साधारण वय वर्षे २५-३० असलेल्या दोन चोरट्यांनी सदर दुकानात जावून महागडी घड्याळे नेमकी कोठे आहे याची दुकानदार यांना विचारणा करून रेकी केली होती.त्यात त्यांनी दुकानदार यांना किमती घड्याळे दाखवा अशी विनंती करून त्यांनी हजारात दाखवली असताना त्यांनी किमान २०-२५ हजारांची घड्याळे दाखवा अशी विनंती करून किमती घड्याळे नेमकी कोठे ठेवली आहे याचा तपास करून ठेवला होता व दिनाक १९ एप्रिल रोजी पहाटे नेमके सदर दुकानाजवळ कोणी नाही पोलिसांची गस्त नाही याची वेळ निवडून सदर दुकानावर हल्लाबोल केला होता.त्यात त्यांनी दुकानाचे शटर खोलण्यासाठी आधी रस्त्याच्या बाजूने दोन चादरी धरून आडोसा तयार केला असल्याचे दिसून येत असून सदर आडोशाला जावून ७-८ चोरट्यांनी शटरला पूर्ण ताकद लावून ते वर केले व दोन चोरट्यांनी बिनबोभाट दुकानात प्रवेश केला असल्याचे दिसून आले होते.त्यांच्या पाठीवर निळ्या व काळ्या रंगाच्या पिशव्या असल्याचे दिसून आले होते.दरम्यान आदल्या दिवशी केलेल्या टेहळणी नुसार नेमका टायटन सारख्या किमती कंपनीचा जवळपास ३२ लाख ६९ हजारांचा माल आतील काऊंटर मधून लंपास केला होता.त्यात ०३ लाख ४७ हजार रुपयांची रोकड तर २९ लाख २२ हजारांची २७५ घड्याळे असा एकूण ३२ लाख ६९ हजारांचा माल चोरी करून धूम ठोकली होती.

यातील १० पैकी ०२ आरोपी अजून फरार आहेत.त्यांचा शोध घ्यायचा आहे.आरोपी परराज्यातील असून ती चौकशीसाठी अधिकचा वेळ लागू शकतो असा दावा सरकारी आभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी करून न्या.पंडित यांचेकडे १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.मोकळ यांनी बाजू मांडली आहे.दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.पंडित यांनी त्यांना ०८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दुकानदार संजय लालचंद लोहाडे (जैन)(वय-३२) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१८९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३३१(४),३०५(अ) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता व चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती.दिनाक ०५ एप्रिल रोजी काकडीतील तिहेरी हत्याकांडानंतर हा प्रकार घडल्याने तालुक्यातील नागरिक हादरले होते.

दरम्यान यातील चोरट्यांचा शोध सुरू केला असता त्यातील चोरटे हे बिहार मधील असल्याचे पोलिसांच्या छ.संभाजीनगर येथील चोरट्यांचा पद्धतीनुसार आढळून आले होते.त्यांनुसार चौकशी सुरू केली असता हे चोरटे पोलिसांना बिहार मधील घोडासहन,तालुक-घोडासहन,जिल्हा मोतीहारी येथील आढळून आले होते.त्यांचा माग काढून पोलिसांनी त्या १० चोरट्या पैकी ०८ चोरट्यांना जेरबंद केले आहे.त्यात सुरेंदर जयमंगल दास (वय-४०),रियाज नईम अन्सारी वय-४०),पप्पू बिंदा गोस्वामी (वय-४४),राजकुमार चंदन साह (वय-४४)राजकुमार विरा प्रसाद (वय-४५),नईम मुन्ना देवान (वय-३०),राहुल कुमार किशोरी प्रसाद (वय-२६),गुलशन कुमार ब्रम्हानंद प्रसाद (वय-२५).आदींच्या मुसक्या आवळल्या आहेत तर या गुन्ह्यात सामील असलेले अन्य दोन जण मोबीन देवान व मुकेश शहा फरार झाले आहे.त्यांचा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश अहिरे व त्यांचे सहकारी पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान यातील ०८ आरोपींना पोलिस अधिकारी किशोर पवार यांनी कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता त्यांना सरकारी अधिवक्ता प्रदीप रणधीर यांनी या आरोपींचा तपास करणे गरजेचे असून हे परप्रांतीय असून यांनी अजून कोठे कोठे गुन्हे केले आहे.यातील केवळ १०.६२ लाख रुपयाचा माल जप्त केला असून उर्वरित माल जप्त करावयाचा आहे.त्याचा शोध घ्यायचा आहे.यातील दोन आरोपी अजून फरार आहेत.त्यांचा शोध घ्यायचा आहे.आरोपी परराज्यातील असून ती चौकशीसाठी अधिकचा वेळ लागू शकतो असा दावा करून न्या.पंडित यांचेकडे १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.मोकळ यांनी बाजू मांडली आहे.दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.पंडित यांनी त्यांना ०८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने तपास करून चोरट्यांचा शोध घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.