जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ गुन्ह्यातील आणखी चार जणांना अटकपूर्व जामीन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या दिवशी म्हणजेच १४ एप्रिल रोजी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरात दोन गटात चॉपरणे एकमेकावर वार झाले होते यात शुभम साहेबराव शिंदे,(वय-२९) व योगेश संजय शिंदे दोघे रा.सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तीन जण जखमी झाले होते.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यातील एक आरोपी जितेंद्र रणशूर यांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.अलमले यांचे समोर जितेंद्र रणशुर यांना अंतरिम जामीन मंजूर केला असताना आज झालेल्या सुनावणीत उर्वरित आरोपी शुभम साहेबराव शिंदे,संतोष निवृत्ती शिंदे,गणेश वाल्मीक शिंदे,योगेश संजय शिंदे आदी चार जणांना अटक पूर्व जामीन मंजुर केला असल्याची माहिती ऍड.व्यंकटेश ख्रिस्ते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र रणशुर यांना अटकपूर्व ऐवजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असताना अन्य आरोपींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.त्यानुसार यातील अन्य आरोपी शुभम साहेबराव शिंदे,संतोष निवृत्ती शिंदे,गणेश वाल्मीक शिंदे,योगेश संजय शिंदे आदी चार जणांनी आपला अर्ज दाखल केला होता;तो न्यायालयाने मंजूर केला आहे.

   कोपरगाव येथे दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना रात्री ११.४० वाजेच्या सुमारास मिरवणूक सुरू असताना फिर्यादी शुभम साहेबराव शिंदे याचा चुलतभाऊ योगेश शिंदे यांस रोहित बाबुराव डोखे,सुमित बाबुराव डोखें,अनिल सुधाकर रन्नवरे,गणेश सुधाकर रन्नवरे संजय साठे सर्व रां.सुभाषनगर यांनी शिवीगाळ केली असून त्यात आरोपींनी सुभाषनगर येथे थेट चॉपरचा वापर केला होता.यात शुभम साहेबराव शिंदे,(वय-२९) व योगेश संजय शिंदे दोघे रा.सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तीन जण जखमी झाले होते.

    या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-८३ व ८४/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १०९(१),११५(५),३५२,१८९,(२),१९१(२),१९१(३),१९०,६१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.मात्र आरोपी फरार होते.त्यांचा शोध पोलिस घेत असताना दोन्ही गटांकडून आपण त्यात नव्हेच अशी भूमिका घेऊन पोलिस अधिकाऱ्याना निवेदन दिले होते.त्यामुळे हा प्रश्न कोणामुळे निर्माण झाला असा सवाल निर्माण झाला होता.

   दरम्यान यातील एक आरोपी जितेंद्र रणशुर यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर समोर केला होता.मात्र न्यायालयाने अटकपूर्व ऐवजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असताना अन्य आरोपींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.त्यानुसार यातील अन्य आरोपी शुभम साहेबराव शिंदे,संतोष निवृत्ती शिंदे,गणेश वाल्मीक शिंदे,योगेश संजय शिंदे आदी चार जणांनी आपली अटक टाळण्यासाठी आपल्या वकिलामार्फत अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात आपला अर्ज आज दाखल केला होता.त्याबाबत आज दुपारी सुनावणी संपन्न झाली असून यातील वरील चारही आरोपींना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.या गुन्हाच एकूण दहा आरोपी होते.अद्याप या गुन्हाच पाच आरोपी फरार असून कोपरगाव शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान यासाठी आरोपींच्या वतीने ऍड.व्ही.पी.ख्रिस्ते यांनी काम पाहिले आहे.त्यांना ऍड.केतन शिरोडे यांनी सहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close