जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ राड्यातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 

   कोपरगाव शहरातील नवीन आय.टी.आय.इमारतीसमोर काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश दत्तात्रय मोरे यांचे सह अन्य साथीदारांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण यांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

यातील दोन आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक करून शहर पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले होते.दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.असलेल्या नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ दिनाक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास घडली होती.तेथे कोपरगाव नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश मोरे यांनी घेतले होते.येथे काम सुरू असताना आरोपीना संबधित ठेकेदार यांनी हरकत घेऊन “सदरचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे,तुम्ही दुसरीकडून जा” असे सांगितल्याचा राग येवून त्यांनी ठेकेदार योगेश मोरे आणि त्यांचे बंधू ,पुतण्या आदींना गज,लाकडी दांडे,दगड आदींच्या सहाय्याने शिवीगाळ करत जोरदार हल्ला चढवला होता.घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन सदरचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता तो फोल ठरला होता.दरम्यान या घटनेत फिर्यादी योगेश मोरे सह त्यांचे बंधू गणेश मोरे,पुतण्या पवन मोरे आदी तीन जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेत कृष्णा आढाव हे मध्यस्थी करताना जखमी झाले होते.

  या प्रकरणी आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण,मजीद रशीद पठाण व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५९/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),(२)११५(२),३५२,१८९(२),१९१(२),(३)१९०,सह फौजदारी दुरुस्ती कायदा कमल ७ प्रमाणे आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून शहर पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले होते.याबाबत सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी सरकारी पक्षाचे वतीने जोरदार बाजू मांडली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.एम.एम.सय्यद यांनी बाजू मांडली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त मुख्य न्या.पंडित यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान अन्य फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.

   दरम्यान या गंभीर गुन्ह्यातील सहभाग असलेले अन्य सहा ते सात आरोपी अद्याप अटक झालेले नाही.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close