जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…”त्या”आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मवीरनगर जवळ सोयेल हरून पटेल (वय-२८) याचा निघून खून केल्या प्रकरणातील अटक आरोपी मच्छिंद्र सोनवणे,योगेश जाधव,महेश कट्टे यांना आज कोपरगाव येथील पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

   

कोपरगाव येथील खून प्रकारणातील तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाचे वतीने ऍड.सोनवणे यांनी युक्तिवाद केला असून त्यात त्यांनी,”तीन आरोपी फरार असून त्यांना अटक करणे बाकी असून त्यांच्या कडील हत्यारे व त्यांच्या ताब्यातील वाहने जप्त करावयाचे आहे” असे सांगून दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूंचा युतीवाद ऐकून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीत वरील तिन्ही आरोपींची रवानगी केली आहे.

 सदरच्या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,”मयत तरुण सोहेल पटेल व प्रमुख आरोपी मच्छीन्द्र सोनवणे यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रमुख आरोपीस संशय होता.त्यावरून तो त्यांच्या मागावर होता.त्यातून ही गंभीर घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.प्रमुख आरोपी मच्छीन्द्र सोनवणे यांने आपले सहकारी मित्र स्वप्नील गायकवाड,महेश कट्टे,विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र,योगेश जाधव उर्फ योग्या आदींना एकत्र करत मयत सोहेल याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता.त्यातून रविवारी रात्री ०८ वाजेच्या सुमारास प्रमुख आरोपी सोनवणे व अन्य एक यांनी त्यास आपल्या टाटा मॅजिक मध्ये (क्र.एम.एच.१५ ई ४७९५) घेऊन गोडगोड बोलून घेऊ गेले होते.तर अन्य दोन मागवून आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी आला होता.या शिवाय आणखी एक जण घटनास्थळी नंतर आला होता.मात्र त्याचे नाव समजू शकले नाही.आदींनी एकत्र येऊन मयत सोहेल पटेल यास चाकू,लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेलालाकडी बांबू आदींनी कर्मवीर नगर मधील जावेद शेख यांच्या रिकाम्या प्लॉट मध्ये नेऊन त्याचा काटा काढला होता.त्याच्यावर चाकूने जबर हल्ला चढवला होता.त्यात त्याचा मृत्यू झाला होता.त्यास उपचारार्थ कोपरगाव नजीक जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले होते.

   दरम्यान आज अटक आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदांधिकारी बी.डी.पंडित यांचे समोर आज दुपारी ३.३० वाजता हजर केले होते.

    त्यावेळी आरोपींच्या वतीने ऍड.जयंत जोशी यांनी बाजू मांडली होती.त्यात त्यांनी,”आरोपी हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना जातीय व धार्मिक रंग देऊन गुंतविण्याचा प्रयत्न होत आहे.घटना घडली ते कर्मवीरनगर येथील ठिकाण अंधारातील असून त्या ठिकाणी प्रकाशाची सोय नाही” असा युक्तिवाद केला आहे.तर सरकारी पक्षाचे वतीने ऍड.आर.के.शिंदे यांनी युक्तिवाद केला असून त्यात त्यांनी,”तीन आरोपी फरार असून त्यांना अटक करणे बाकी असून त्यांच्या कडील हत्यारे व त्यांच्या ताब्यातील वाहने जप्त करावयाचे आहे” असे सांगून दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूंचा युतीवाद ऐकून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीत वरील तिन्ही आरोपींची रवानगी केली आहे.दरम्यान पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close