जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

अल्पवयीन मुलीचा विनयभंग,आरोपीस पाच वर्षांची सक्त मजुरी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सन-२०१८ साली अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिची छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुंह्यातील आरोपीस कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयाने भा.द.वि.कलम ३५४ (अ)पोक्सो कलम ८ अन्वये धोंडिबा शिंदे या आरोपीस ०५ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावला असून तो न भरल्यास तीन महिन्याची सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली आहे.

  

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन-२०१८ मध्ये हि घटना घडली होती.या घटनेतील आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग करून तिची छेडछाड केल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप होता.त्यात वरील आरोपी धोंडिबा शिंदे यास शिक्षा सुनावली आहे.त्याचे नागरिकांनी समाधान केले आहे.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले,लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा-२०१२ तयार करण्यात आला.हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला.यामध्ये मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे,पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश करण्यात आला आहे.या नवीन कायद्याद्वारे विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना शिक्षा करता येईल,अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये बालकांचा विनयभंग हा सुद्धा गुन्हा ठरवण्यात आला आहे.राज्यात १८ वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला असला तरीही अद्याप गुन्हे कमी झाल्याचे दिसत नाही.मात्र यावर कोपरगाव येथे एक गुन्हा सिद्धीचे प्रकरण समोर आले असून त्यात आरोपीस वरील कोपरगाव येथील न्यायालयाने सुनावली आहे.त्यामुळे कोपरगावसह नगर जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.

   या प्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी.डी.पानगव्हाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती.या घटनेतील आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग करून तिची छेडछाड केल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप होता.
दरम्यान या प्रकरणी तत्कालीन शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा चौकशी अधिकारी सागर पाटील व अभिजित सुरेश शिवतारे यांनी चौकशी करून जिल्हा व सत्र न्यायालयाचे पोक्सो न्यायालयात  दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी.एम.पाटील यांचे समोर संपन्न झाली आहे.

   या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाबासाहेब पानगव्हाणे यांनी काम पाहिले होते.त्यात त्यांनी सात साक्षिदार तपासले होते.व अंतिम युक्तिवाद केला होता.त्यासाठी त्यांना पैरवी अधिकारी म्हणून अमोल फाटांगरे यांनी सहकार्य केले होते.त्यात पीडितेची साक्ष महत्वाची ठरली होती.जिल्हा न्या.बी.एम.पाटील यांनी सरकारी पक्षाच्या वतीने सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी धोंडिबा काशिनाथ शिंदे यास पाच वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिन्याची सक्त मंजुरीची शिक्षा ठोठावली असल्याने या अपप्रवृत्तीवर चाप बसण्यास मदत मिळणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close