जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेप,दहा हजारांचा दंड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील लोणी येथील रहिवासी असलेला नरेंद्र राजेंद्र भोसले व त्यांच्या भाचीवर खुनी हल्ला करून त्यातील नरेंद्र भोसले याच्यावर पुणे येथे उपचार सुरु असताना त्यात त्याचे निधन झाले होते यातील गुंह्यातील कुख्यात आरोपी लाला रंजन भोसले याच्यावर कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी नुकतीच संपन्न होऊन न्यायालयाने त्यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी असून दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अड्.अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे राहाता,कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

नरेंद्र भोसले याचा खून केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.घटना बघणारे साक्षिदार त्यांचे जबाब फिर्यादीचा जबाब,पंचनामे करणारे पंच,वैद्यकीय अधिकारी आदींची साक्ष,परिस्थिती जन्य पुरावा बघून आरोपी लाला रंजन भोसले यास जन्ममठेपेची शिक्षा,व दहा हजारांचा दंड,दंडाची रक्कम न दिल्यास तीन महिन्याची शिक्षा व कलम ३२४ अन्वये पाच वर्ष शिक्षा व पाच हजारांची दंडाची रक्कम न दिल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,” राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी व मयत इसम नरेंद्र राजेंद्र भोसले व त्याची भाची कु.स्नेहल कैलास चव्हाण हे दोघे दि.१७ मे २०१८ रोजी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून रात्री ८.१५ वाजता आपल्या प्रवरानगर येथील घरी जात असताना त्याच भागातील कुप्रसिद्ध गुंड लाला रंजन भोसले याने त्यांना दोघाना अडवले होते.व त्यांना शिवीगाळ करून मागील भांडणाच्या कारणावरून त्याचे पोटात चाकूचा वार केला होता.त्यात त्यावेळी सदर भांडण सोडविण्यासाठी त्याची भाची कु.स्नेहल चव्हाण हि मध्ये पडली असता तिच्या हातावर त्याने चाकूचा गंभीर वार केला होता.त्यात तिच्या हाताच्या शिरा तुटून ती गंभीर जखमी झाली होती.त्यावेळी फिर्यादी हा केवळ चाळीस फुटावर उपस्थित होता.त्याने हि घटना आपल्या डोळ्याने पाहिली होती.त्याने त्या दोघांना  उपचारासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले होते.तर कु.स्नेहल चव्हाण हि गंभीर जखमी असल्याने तिला पुणे येथील ससून रूग्णालयात भरती केले होते.त्यात उपचारा दरम्यान नरेंद्र भोसले याचे गंभीर वार झाल्याने त्यात त्याचे पाच दिवसानंतर दि.२२ मे २०१८ रोजी निधन झाले होते.घटनेनंतर आरोपी लाला भोसले हा त्याचा सहकारी ललित कुंजीर यांच्या दुचाकीवर फरार झाला होता.

दरम्यान त्या बाबत लोणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.भा.द.वि.कलम ३०२,३२४,३२६,५०४,५०६,३४ प्रमाणे कुणाल राजेंद्र भोसले याने फरार आरोपी लाला भोसले याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

   या प्रकरणी लोणी पोलिसांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते.त्यात सरकारी पक्षाच्या वतीने पंधरा साक्षिदार तपासण्यात आले होते.त्यामध्ये कु.स्नेहल व इतर साक्षिदार,पंच,वैद्यकीय अधिकारी,आदींनी परिस्थितीजन्य पुरावे सरकारच्या वतीने न्यायालयाचे समोर आणले होते.या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायमूर्ती बी.एम.पाटील यांचे समोर कामकाज चालले होते.

   त्यात सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.घटना बघणारे साक्षिदार त्यांचे जबाब फिर्यादीचा जबाब,पंचनामे करणारे पंच,वैद्यकीय अधिकारी आदींची साक्ष,परिस्थिती जन्य पुरावा बघून आरोपीस जन्ममठेपेची शिक्षा,व दहा हजारांचा दंड,दंडाची रक्कम न दिल्यास तीन महिन्याची शिक्षा व कलम ३२४ अन्वये पाच वर्ष शिक्षा व पाच हजारांची दंडाची रक्कम न दिल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

  दरम्यान या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी काम पहिले तर पैरवी अधिकारी म्हणून लोणी येथील तत्कालीन सहाय्यक फौजदार एन.एस.माळी,त्यांना सरकारी वकिलांचे सहकारी श्रीनिवास जोशी यांनी सहकारी केले आहे.या गुन्ह्यात गुंडाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close