जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘लव्ह जिहाद’ प्रकरण…’त्या’ आरोपींचा पोलीस कोठडी बाबत हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव येथील एका मुलीस ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात फसी पाडल्या प्रकरणी व धर्मपरिवर्तन केल्या प्रकरणी पहिल्यांदा पकडलेले तीन आरोपी सायन शहाबुद्दीन कुरेशी या प्रमुख आरोपीसह इमरान आयुब शेख (वय-३१) मोबाईल शॉपी,रा.आयेशा कॉलनी,फय्याज वहाब कुरेशी (वय-४५)रा.कोपरगाव आदींची सात दिवसांची कोठडीची मुदत संपल्याने आज कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची दि.२० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी गुरुवार दि.२० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले आहे.त्यासाठी विविध संघटना आणि त्याचे पदाधिकारी यांनी मोठा पाठींबा दर्शवला आहे.या मोर्चास साधारण दहा-पंधरा हजार नागरिक यात सामील होतील असा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला असल्याचे दिसत आहे.

‘लव्ह जिहाद’च्या घटना महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने त्या बाबत प्रतिबंधात्मक कायदा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.त्यामुळे सदर मुद्दा मागील काही दिवसांपासून खुपच चर्चेला आला आहे.परिणामस्वरूप महाराष्ट्रात सुध्दा हा कायदा करण्यात येणार अशा चर्चा महाराष्ट्रात चालू झाल्या आहेत.मात्र या आगोदर हा कायदा उत्तर प्रदेश,हरियाणा,कर्नाटक,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे.मात्र महाराष्ट्रात मात्र,चालचकल करण्याचा काहीसा प्रकार सुरु असताना दिसत आहे.त्यातच अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.यातील मुलगी (वय-२०) हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून प्रमुख आरोपी हा सायम कुरैशी मध्य प्रदेशातील इंदोर येथील जुना पिठा येथील रहिवासी आहे.

या घटनेतील आरोपी याने तीन वर्षांपूर्वी संबंधित फिर्यादी मुलीशी तिच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क करून व मैत्रीचे नाटक केले व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दि.२१ मे रोजी सकाळी ०६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.व त्यानंतर तिला कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर बोलावून तिला खडकी येथील मदरसा येथे येण्यास सांगितले असता तिने त्यांना त्याबाबत विरोध केला असता तिच्यावर शारीरिक अत्याचार केले असल्याचा आरोप केला होता.

कोपरगाव शहरानजीक असलेल्या खडकी येथील मदरशात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग आणि बळजबरीने धर्मांतर केल्याचे आरोप करत शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध,’लव्ह जिहाद’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात हे प्रकरण खूप गाजत आहे.त्यामुळे पोलिसांनी दक्षता घेत यातील वरील तीन आरोपी प्रथम जेरबंद करून त्यांना जेरबंद केले होते.व त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दोवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.तिची मुदत आज संपली होती.

दरम्यान पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आज पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांचे मार्फत त्यांना आज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले होते.सदर प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी तपास अद्याप बाकी असून एक आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा केला असून यात या आरोपीकडून तपास बाकी असल्याने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी कोपरगाव शहर पोलिसांनी केली होती.तर आरोपीच्या वकिलांनी बचाव केला होता.या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला इंदोर हरी मस्जिद जुना पेठा येथील आरोपी मौलवी मोहंमद सोयब नुरी (वय-३१) यास अटक करून काल कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असताना त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close