जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

परतीच्या पावसाची नुकसान भरपाई द्या-…या माजी खासदारांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी व संततधार पाऊस झाला.खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा केली त्यानंतर नुकसानीचे पंचनामे झाले.जिल्ह्यातील ७ लाख २३ हजार ९३० शेतकऱ्यांचे ४लाख ४१ हजार १२१.५८ हेक्टर क्षेत्र बाधित निघाले.त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ८७७ कोटी २१ लाखांची मागणी केली.परंतु,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले नाही ते ताबडतोब मिळावे अशी मागणी माजी खा.प्रसाद तनपूरे यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

“सलग चार वर्षे सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.यंदा अतिवृष्टी,संततधार पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे.शासकीय मदत तोकडी असून तीही वेळेवर मिळत नाही.राज्य शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित द्यावी”- प्रसाद तनपुरे,माजी खासदार,कोपरगाव लोकसभा मतदार संघ.

राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जीवापाड जपलेल्या पिकास परतीच्या पावसाने मोठा तडाखा दिला होता.त्यामुळे ऐन काढणीला आलेले खरीप पीक ऐन वेळी वाया गेले.अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना भरीव अनुदान दिले जावे अशी मागणी केली जात होती.या अनुषंगाने नाशिक,पुणे,औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्तांनी शासनाकडे नुकसान भरपाईची पत्राद्वारे मागणी केली होती.

नाशिकसह विविध विभागीय आयुक्तानी विभागातील विभागीय आयुक्तांनी नोव्हेंबर महिन्यात रोजी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दिली जावी यासाठी पत्र लिहिले होते.मात्र याविभातील शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केल्यावर शासनाने पंचनामे केले.अनुदानाची मदत जाहीर केली.रब्बी हंगामाच्या तोंडावर बियाण्यांना पैसे होतील.नुकसान मोठे असले.तरी शासनाची अल्पशी का होईना मदत मिळेल.ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

शेतकऱ्यांनी उधारी,उसनवारी करून रब्बीच्या पेरण्या उरकल्या.शासकीय मदतीची वाट पाहत राहिले.दीवाळी सणापूर्वी पंचनाम्याप्रमाणे अनुदान दिले जाईल अशी घोषणा झाली होती.शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या.परंतु,पुन्हा शेतकऱ्याचा भ्रमनिरास झाला आहे.हिवाळी अधिवेशन सुरु झाले.तरी,अनुदानाचे नाव निघेना.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी आंदोलने केली मात्र त्याची दाखल घेतली गेली नाही असेही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
अ.नगर जिल्ह्यात सप्टेंबर,ऑक्टोंबर २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे असे-तपशील,शेतकरी संख्या,बाधित क्षेत्र (हे.)अनुदान मागणी (लाखांत) पुढील प्रमाणे अतिवृष्टी-२५५०६८,१५५३५५.७१-२९०९१.४२,सतत पाऊस-४,६८,८६२-२,८५,७६५.८७-५८,६३०.०६ एकूण अनुक्रमे- ७,२३,९३०,४,४१,१२१.५८,८८,७२१.४८ आदिंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close