जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

कोपरगाव तालुक्यात पावसाचा कहर,कृषी क्षेत्राचे काही कोटींचे नुकसान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात आज पहाटे एकच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने कोपरगाव शहर परिसरासह तालुक्याला झोडपून काढले असून खडकी उपनगरातील लोकवस्तीत पाणीच पाणी झाले असून खंदक नाला परिसरातील कर्मवीरनगर,बैल बाजार रोड,स्टेशन रोड परिसरात असलेल्या नागरी वस्तीत पाणीच पाणी झाले असून कोपरगाव तुळजाभवानी मंदिर परिसरात महावितरण कंपनीची तार तुटून त्यात एक गाय आणि दोन कुत्रे ठार झाले आहे मात्र तालुक्यात अन्यत्र कोठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.नागरिकांचा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

गोकुळनगरी येथील व्यापारी संकुल पाण्याखाली त्याचे छायाचित्र.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज पहाटे एक वाजे नंतर पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे.सुमारेच चार तास कोसळल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.एकूण पाऊस १०५ मी.मी.कोसळला असल्याची माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान खात्याचे कर्मचारी केतन पर्हे यांनी दिली आहे.आज सकाळी त्याची भयावहता समोर आली आहे.

कर्मवीर नगरी येथील शिक्षक कॉलनी पाण्याखाली गेली त्याचे छायाचित्र.

दरम्यान कोपरगाव शहरात प्रवेश करणाऱ्या स्टेशन रोड वर खंदक नाल्यावरून पाणी कोसळताना दिसत होते मात्र त्याचा छोटी वहाने वगळता वाहतुकीस अडथळा आला नाही.दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या छोट्या पुलावर उभा करून ठेवलेला ट्रक वाहून गेला असता मात्र तेथे असलेल्या मोठ्या पुलाचे त्यास आधार मिळाल्याने तो कसाबसा तग धरून राहिला असल्याचे दिसून आले आहे.त्याच ठिकाणी शंभर मीटर वरील बाजूस असलेल्या म्हैस गोठ्यात पाणी घुसले असून बैल बाजार रोडची दुरावस्था वेगळी नव्हती.

खडकी परिसरातील पावसाचे भयावह चित्र.

कर्मवीरनगर येथील शिक्षक कॉलनी संपूर्ण पाण्यात गेली आहे.तेथील नागरिकांना द्वारकानगरी आणि खडकी परिसरातील नागरिकांना आपली रात्र जागून काढावी लागली असल्याची माहिती रावसाहेब थोरात आणि सुनीता थोरात यांनी दिली आहे.वर्तमानात पाणी पातळी खालावली असली तर घरा-घरात पाणी दिसून येत आहे.

खडकी परिसरात घरात घुसलेले पाणी काढताना असहाय तरुण छायाचित्रात दिसत आहे.

द्वारकानगरी येथील पूल वाहून गेला आहे.तेथील अनेक घरांच्या संरक्षक भिंती पडल्या आहेत.त्यामुळे नागरिकांना आपल्या खाण्यापिण्याची पंचायत होताना दिसून आली आहे.दिवाळी सण काही तासांवर येऊन ठेपला असताना घराची साफसफाई केलेली पाण्यात गेली आहे.त्यामुळे दिवाळी सणा ऐवजी नागरिकांना आलेली आपत्तीचा सामना करण्याची नामुष्की ओढवली आहे.

दरम्यान आपद्ग्रस्त ठिकाणी भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी नगरसेवक जनार्दन कदम,वैभव गिरमे,संदीप वर्पे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले आदींसह महसूल यंत्रणा आदींनी धाव घेतल्याचे दिसून आले आहे.

कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या द्वारका नगरी येथील पूल पावसाने वाहून गेला आहे त्याचेच छायाचित्र.

तालुक्यात राहुरी पासून कोपरगाव सह उत्तर नगर जिल्ह्यात या पावसाने हाहाकार उडवला आहे.शेतीत पाणीच पाणी निर्माण झाले असून खडणीला आलेली सोयाबीन आणि बाजरी व तत्सम खरीप पिकांना मुकावे लागणार आहे.सोयाबीन तर आधीच घुडघाभर पाण्यात काढण्याची नामुष्की ओढवली असताना आता रात्रीच्या पावसाने कहर उडवला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.तालुक्यातील सर्वच ओढे-नाले तुडुंब वाहताना दिसत आहे.

स्टेशन रोडवरील पुराचे छायाचित्र पुलाचे कठडे असल्याने ट्रक वाचला आहे.

दरम्यान माहेगाव देशमुख ते मढी खुर्द हा रस्ता ओढ्याना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बंद पडला आहे.त्या भागातही शेती उध्वस्त झाली आहे.माहुसल विभागाने आधीच पंचमाणे केले सल्याचे अधिकचे पंचनामे होणे शक्य दिसत नाही त्या मुळे आधीचा पाऊस बरा म्हणण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवली असल्याची माहिती अड्.दिलीप लासुरे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण अठरा कि.मी.अंतरावरील जवळके,बहादरपूर आदी परिसरातही पावसाचे विदाराक चित्र आहे.तेथेही खरीप पिके पाण्याखाली गेली आहे.काढलेली पिके गुडघाभर पाण्यात बुडाली आहे.जी पिके काढणीनंतर घरी आणली ती पाण्यात न्हाऊन निघाली आहे.राहाता-वावी हा साईभक्तांना सर्वात जवळचा ठरणारा रस्ता बहादरपूर येथे पाण्याखाली गेला आहे.

दरम्यान कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या टाकळी फाटा येथील कांदा व्यापाऱ्यांचे कांदे थेट वाहून गेले असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्या प्रमाणेच रडण्याची वेळ आली आहे.

कोपरगाव तालुक्यात अन्यत्र वेगळे चित्र नाही अधिकचे नुसानीच्या बातम्या आज अजूनही येत आहेत.कर्मवीर नगर आणि खडकी परिसरात मात्र नागरिकांना दिवाळी साजरी करण्याऐवजी दिवाळे निघण्याची नामुष्की ओढवली आहे.प्रशासन तालुक्यातील विविध ठिकाणचे नुकसानीची माहिती घेत असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close