नैसर्गिक आपत्ती
अतिवृष्टीबाबत पंचनामे करा-कोपरगावात अधिकाऱ्यांना सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात अतिवृष्टीमुळे शेतीचे व नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने पाठवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अ.’नगर जिल्ह्यात १ जून पासून ते आतापर्यंत सरासरी ३०६.० मिलीमीटर पाऊस झाला आहे.कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरी १९.१ मिलीमीटर पाऊस झाला.कालच्या एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात सरासरी ६४.५ मिलीमीटर झाला.तर त्याखालोखाल राहाता तालुक्यात सरासरी ४७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगाव तहसील कार्यालय येथे आ.काळे यांनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात बैठक घेवून महसूल व कृषी विभागाकडून सविस्तर माहिती घेतली व महसूल विभागाच्या विजय सप्तपदी अभियानासंदर्भात आढावा बैठक घेतली असून या प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत.
तसेच कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील दफनभूमी व स्मशानभूमीच्या नागरिकांच्या अडचणी आहेत या अडचणी दूर करण्यासाठी दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा अशा सूचना दिल्या आहेत.
सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,अनिल कदम,राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे,सुरेश जाधव,शंकरराव चव्हाण,विष्णु शिंदे,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,सुनील शिंदे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता भूषण आचार्य,अभियंता अतुल खंदारे,कृषी अधिकारी मनोज सोनवणे,योगेश सोनवणे,भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय भास्कर,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,तालुक्यातील तलाठी,मंडलाधिकारी,कृषी मंडलाधिकारी,ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.