नैसर्गिक आपत्ती
कोपरगाव तालुक्यात गणेश बंधारा फुटला,खरीपाचे मोठे नुकसान

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या व संवत्सर गांवाला वरदान ठरणारा गणेश बंधारा आज पहाटे पाच वाजता फुटून आसपासच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.या नुकसानीची कोपरगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच मंडलाधिकारी,निरीक्षक, कारखान्याचे व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी पाहणी केली असून पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरचा पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असल्याची माहिती हाती आली आहे.
सदरचा फुटलेला बंधारा हा सन १९८९-९० च्या दशकात संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या स्किमद्वारे साखळी पध्दतीने कोल्हे-परजणे एकत्र असताना तो गोडबोले गेटच्या पध्दतीने बांधण्यात आलेला होता.पुढे स्व.नामदेवराव परजणे पाटील व माजी मंत्री कोल्हे यांच्या प्रयत्नाने शेती महामंडळाच्या जमिनीत हा बंधारा जिल्हा परिषदेच्या सेस योजनेअंतर्गत विस्तारण्यात आला होता.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात सततधार पाऊस पडत असून आज गुरुवार दि.११ रोजी पहाटे पाच वाजता या बंधाऱ्याला अचानक भगदाड पडले.ही वार्ता ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच सरपंच,उपसरपंच यांना समजली.त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांसह बंधाकडे धाव घेतली.परंतु पाऊस पडल्यामुळे व चिखलमय शेत झाल्याने यंत्रणा कुचकामी ठरली.त्यामुळे गांवकऱ्यांना काहीही करता आले नाही.
सदरचा बंधारा हा सन १९८९-९० च्या दशकात संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या स्किमद्वारे साखळी पध्दतीने कोल्हे-परजणे एकत्र असताना तो गोडबोले गेटच्या पध्दतीने बांधण्यात आलेला होता.पुढे स्व.नामदेवराव परजणे व माजी मंत्री कोल्हे यांच्या प्रयत्नाने शेती महामंडळाच्या जमिनीत हा बंधारा जिल्हा परिषदेच्या सेस योजनेअंतर्गत विस्तारण्यात आला.पुढे त्या बंधाऱ्याखाली ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमार्फत विहीर खोदण्यात आली त्या विहिरीतून व त्या विहीरीतून संवत्सर गांवाच्या हद्दीतील वाड्या वस्त्या,मनाई वस्ती, औद्योगिक वसाहतीसाठी पाणी पुरवठा करण्याची सोय केली गेली.यासाठी रात्रंदिन ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांची यंत्रणा काम करत आहे.त्यामुळे कितीही दुष्काळ आला तरी या विहीरीतील पाणी संपूर्ण परिसराला व आसपासच्या काही गावांना या पाण्याचा लाभ होतो.त्यामुळे वर्षभर मुबलक पाणी मिळते.
सदरचा बंधारा फुटल्यामुळे आसपासच्या शेतात पाणी शिरून मका,सोयाबीन,ऊस,घास. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
या बाबत राजेश परजणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री राधाकृष्ण विखे आदींना निवेदने पाठवून नुकसान भरपाई मिळून देण्याची मागणी केली. व झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी,जि.प.चे माजी सदस्य राजेश परजणे,उपसरपंच विवेक परजणे,संजीवनीचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,सरपंच सुलोचना ढेपले.दिलीप ढेपले,लक्ष्मणराव सावळे,लक्ष्मण परजणे,चंद्रकांत लोखंडे,शिवाजी गायकवाड,रविंद्र बढे,बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर कासार,बबनराव भाकरे,कारभारी भाकरे,जालिंदर रोहोम,श्री भवर,रविंद्र भाकरे,बाळासाहेब दहे,हबीब तांबोळी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मंडलाधिकारी,ग्रामसेवक श्री आहिरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी,ग्रामस्थ बहु संख्येने हजर होते.