नैसर्गिक आपत्ती
कोपरगावात मोठा पाऊस,…हा रस्ता फुटल्याने केला बंद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-भरवस रस्त्यावर असणारा व वर्तमानात नविन पुलाचे काम सुरू असणारा ब्राह्मणनाला येथील पर्यायी सेवा रस्ता हा खडखडी बंधारा फुटल्यामुळे पावसाने खचला असून त्या रस्त्यावरील वहातून बंद करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“सावळीविहिर फाटा ते भरवस फाटा या रस्त्यावर वर्तमानात ब्राम्हणनाला या ठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याचे व सदर काम हे सार्वजनिक बांधकाम संगमनेर या विभागाच्या अंतर्गत येतो.सदर पुलाला पर्यायी रस्ता तयार करून दिला होता.मात्र नुकत्याच झालेल्या पर्यायी रस्ता ओढ्याला आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने फुटला असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे”-प्रशांत वाकचौरे,सहाय्यक अभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव.
अ.’नगर जिल्ह्यात १ जून पासून ते आतापर्यंत सरासरी ३०६.० मिलीमीटर पाऊस झाला आहे. कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरी १९.१ मिलीमीटर पाऊस झाला.कालच्या एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात सरासरी ६४.५ मिलीमीटर झाला.तर त्याखालोखाल राहाता तालुक्यात सरासरी ४७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास प्रारंभ झाला आहे.अशीच घटना गुजरात मधील साई भक्तांना शिर्डी या तीर्थ क्षेत्रासाठी सर्वात जवळचा ठरणारा सावळीविहिर फाटा ते भरवस फाटा या रस्त्यावर वर्तमानात ब्राम्हणनाला या ठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याचे व सदर काम हे सार्वजनिक बांधकाम संगमनेर या विभागाच्या अंतर्गत येतो.सदर पुलाला पर्यायी रस्ता तयार करून दिला होता.मात्र नुकत्याच झालेल्या पर्यायी रस्ता ओढ्याला आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने फुटला असल्याचे दिसून आले आहे.सदर रस्त्यावर रात्री दोन वजेच्यास सुमारास किमान दोन ते तीन फूट पाणी असल्याचे दिसून आले आहे.शिवाय या रस्त्यावरून श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी सप्ताहसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येताना दिसत असून त्यांची गैरसोय निर्माण झाली आहे.त्यामुळे वाहतूक दारांनी या मार्गाचा वापर करून नये असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी केले आहे.