जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

महसूल सप्ताहानिमित्त कोपरगावात…हा कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

कोपरगांव तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या‌ वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग कसा काढावा व उपाययोजने विषयी कोपरगाव नजीक असलेल्या गोदावरी नदी पात्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ नुसार,सातत्यपूर्ण व एकात्मिक नियोजन प्रक्रिया,व्यवस्थित रचना,सहकार्य आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्याला प्रतिबंध,आपत्तीतील धोक्यांची तीव्रता कमी करणे,क्षमता सबलीकरण, पूर्वतयारी,तत्पर प्रतिसाद,आपत्ती परिणामांची तीव्रता,व्यापकता पडताळून पाहणे,स्थलांतर,मदत व बचाव कार्य,पुनर्वसन व पुनर्रचना इत्यादी आवश्यक किंवा उपयुक्त उपायाची अंमलबजावणी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याप्रसंगी तहसीलदार संदिपकुमार भोसले,प्रशिक्षणार्थी तहसीलदार विकास गंबरे,तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे,आपदा मित्र योगेश कोळगे,मुकुल अहिरे,किरण सिनगर,दिपक थोरात,‌तेजस चव्हाण,विजय साटोटे,अमित खोकले,सुषमा खिलारी,सागर पवार,सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आपदा मित्र सहाय्यक योगेश कोळगे यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळणी,तसेच लाईफ जॅकेट तातडीने कसे परिधान करावे.याबाबत शास्रोक्त माहिती दिली.गोदावरी पात्रातील शुक्रतीर्थ घाटावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे,उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांचे मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close