निवड
माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच आत्मा मलिक शैक्षणिक संकुल या ठीकाणी संपन्न झाली असून त्यात कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी नंदू उसरे तर सचिव पदी प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी या शैक्षणिक वर्षातील निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच आत्मा मलिक शैक्षणिक संकुल या ठीकाणी संपन्न झाली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत हे होते.त्यावेळी हि निवड करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष निवृत्ती इले,संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे,मुख्याध्यापक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजेंद्र सोनवणे,अकोले तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव तुरा कानवडे,संघाचे बाळासाहेब वाकचौरेआदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आत्मा मलिक संकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी केले आहे.कोपरगांव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची निवड या प्रसंगी जाहीर करण्यात आली आहे.त्यावेळी हि निवड करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली.यामध्ये कोपरगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून बाळू बिरे,सहसचिव म्हणून मीराताई जोशी तर खजिनदार म्हणून राजेंद्र पाचोरे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय शिंदे,निरंजन डांगे,वसंत बागल,एम.आर.शेख,वंदना मराठे, प्रशांत गाडे,गणपत मंडलिक,चिलीया जगताप,विश्वनाथ शेळके,बाळासाहेब गुडघे,तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मकरंद कोऱ्हाळकर व सुनिता पारे आदींची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी या शैक्षणिक वर्षातील निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव मकरंद को-हाळकर यांनी तर सुत्रसंचलन तालुका मुख्याध्यापकांचे सचिव प्रकाश देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार नुतन अध्यक्ष नंदु उसरे यांनी मानले आहे.