निवड
…या नागरी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुपेकर तर उपाध्यक्षपदी वाघ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पिपल्स बँक व गौतम सहकारी बँकेचे सेवकांचे पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२०२७ करीता नुकतीच निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली असून नूतन अध्यक्षपदी राजेंद्र सुपेकर यांची तर उपाध्यक्षपदी वाघ यांची निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव पिपल्स बँक व गौतम सहकारी बँकेचे सेवकांचे पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२०२७ करीता नुकतीच निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली सदरची निवडणूक बिनविरोध होऊन संचालक पदी सुरेश भगवंतराव देशमुख,राजेंद्र भास्कर पवार,दिलीप मच्छिंद्रनाथ उगले,विष्णू भिमराज होन,संजय सोपान ठाणगे,किशोर परसराम आगवन,दत्तू बनकर वाघ,शैलेश गोरख कदम, राजेंद्र बाळासाहेब सुपेकर,प्राजक्ता परेश श्रॉफ, मंगल प्रदीप सदाफळ यांची बिनविरोध निवड झाली.तद्नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी राजेंद्र रहाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,यात अध्यक्ष पदाकरिता राजेंद्र सुपेकर यांचे नावाची सूचना राजेंद्र पवार यांनी आणली,त्यास सुरेश देशमुख यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदाकरिता दत्तू वाघ यांचे नावाची सूचना विष्णू होन यांनी आणली, त्यास किशोर आगवण यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता एक-एकच अर्ज आल्याने दोघांचीही एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र रहाणे यांनी जाहीर केले आहे.
यावेळी पिपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे व गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड,विठ्ठल रोठे,चंद्रशेखर व्यास यांनी सदर निवडीबद्दल अभिनंदन केले,सेक्रेटरी जितेंद्र छाजेड व सेवक प्रदीप मेढे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे,निवडणूक अधिकारी राजेंद्र रहाणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.