निवड
कोपरगाव तालुक्यातील…या वि.का.स.सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील कुंभारी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या तेरा संचालक मंडळाची निवडणून मोठ्या उत्साहात संपन्न झाली होती.त्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली असून त्यात अध्यक्षपदी ज्ञानदेव कदम तर उपाध्यक्षपदी सतीश कदम यांची निवड झाली आहे.या सर्व उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कुंभारी येथील सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच सहकार विभागाने दि.२४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केली आहे.या संस्थेने शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधी अनेक लाभकारक योजना संस्थेने राबविल्या असून सहकार क्षेत्रात या संस्थेने आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.यात सत्ताधारी कोल्हे गटाचे राघवेश्वर एकता पॅनलचे आठ संचालक तर काळे गटाचे पाच निवडून आले होते.त्यात हि निवड जाहीर झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणाऱ्या कुंभारी येथील सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच सहकार विभागाने दि.२४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केली आहे.या संस्थेने शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधी अनेक लाभकारक योजना संस्थेने राबविल्या असून सहकार क्षेत्रात या संस्थेने आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.यात सत्ताधारी कोल्हे गटाचे राघवेश्वर एकता पॅनलचे आठ संचालक तर काळे गटाचे पाच निवडून आले होते.त्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक नुकतीच सहकार विभागाने जाहीर केली होती.त्यात अध्यक्ष पदाची सूचना विजय कदम यांनी मांडली होती.तर उपाध्यक्ष पदाची सूचना सोपान ठाणगे यांनी मांडली होती.
या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून,महिला गटातून,इतरमागासवर्ग प्रवर्गातून,अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून,भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून विविध उमेदवार यांचा समावेश आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.