जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या सोसायटीच्या अध्यक्षपदी आढाव तर उपाध्यक्ष पदी सावंत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात सुमारे ७२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या उत्साहात व बिनविरोध संपन्न झाली आहे.यात अध्यक्षपदी वैभवराव आढाव तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना पिक कर्ज,शेती उपयुक्त नामांकित खत कंपन्यांची विक्री व्यवस्था,इंडियन ऑईल कंपनीचा पेट्रोल,डिझेल आणि ऑईल विक्रीचा पंप आहे.वाहनांच्या इंजिनची निगा राखण्यासाठी एक्स.पी.९५ या प्रकारचे पर्यावरणपुरक पेट्रोल विक्री सेवा आहे.इंडियन ऑईलचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे “सर्वो” ऑईल उपलब्ध आहे”-वैभव आढाव-अध्यक्ष,कोपरगाव वि.का.सहकारी संस्था.

कोपरगाव तालुक्यात सन १९५० पासून कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे.या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना पिक कर्ज,शेती उपयुक्त नामांकित खत कंपन्यांची विक्री व्यवस्था,इंडियन ऑईल कंपनीचा पेट्रोल,डिझेल आणि ऑईल विक्रीचा पंप आहे.वाहनांच्या इंजिनची निगा राखण्यासाठी एक्स.पी.९५ या प्रकारचे पर्यावरणपुरक पेट्रोल विक्री सेवा आहे.इंडियन ऑईलचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे “सर्वो” ऑईल उपलब्ध आहे.पंपावर ग्राहकांना थेट ऑनलाईन द्वारे पैसे स्विकारण्यासाठी आधुनिक प्रणाली आहे,याचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांना मिळत आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या जन धन योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकाने सन्मान झालेली महाराष्ट्र राज्यातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे.

कोपरगाव सोसायटीच्या नव्याने झालेल्या सन २०२२ ते २०२७ या कार्यकालाच्या संचालक निवडीची सर्व प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे.त्यानंतर संचालक मंडळातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे.

यात अध्यक्ष पदी वैभवराव शंकरराव आढाव,उपाध्यक्षपदी दत्तात्रय रामभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे.संचालक मंडळात चंद्रकांत सहादू आढाव,पोपटराव कोंडाजी नरोडे,महेंद्र बाबुराव पाटील,प्रविण शंकरराव शिंदे,केशवराव रंगनाथ साबळे, चंद्रशेखर छबुराव आव्हाड,रामनाथ सुभाष शिंदे,संजय पाराजी वडांगळे,शैलजा अंबादास आढाव,चित्रा विश्वासराव महाले यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार करण्यात निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.क्षीरसागर,सहाय्यक एस.पटेल यांचे सह सोसायटीचे सचिव बी.आर.येवले,संजय नळे,नंदकुमार भोसले यांचे सहकार्य लाभले.नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close