निवड
कोपरगाव तालुका मुस्लीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी या महिलेची निवड

न्यूजसेवा
गोधेगाव-(वार्ताहर)
मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती सायराबानू शेख यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका अध्यक्षपदी गोधेगाव येथील महिला कार्यकर्त्या शकील रहिमका पठाण यांची निवड जाहीर केली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदंन होत आहे.
शकील रहिमका पठाण यांचे महिला बचत गट सामाजिक काम करताना नेहमी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अग्रेसर असल्याने त्यांची नियुक्ती झाल्याचे समजते.या निवडीमुळे त्यांचे विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.