निवड
…यांची विस्तार अधिकारी पदी निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील शिक्षक नेते ज्ञानेश्वर माळवे यांची पदोन्नतीने नुकतीच अकोले येथे विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर निवड झाली आहे.त्यांनी टीचर्स इलीजीबीलीटी टेस्ट (टी.इ.टी.) ही पात्रता परीक्षा सप्टेबर २०२५ मध्ये दिली होती त्यात पहील्याच प्रयत्नात त्यांनी ती परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

नुकत्याच जिल्हा परीषद अहील्यानगरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांचेसह शिक्षण विभागाने राबवलेल्या पदोन्नती प्रक्रीयेमध्ये पात्र मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख व उपशिक्षकांमधुन पाच जणांना विस्तारअधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे. त्यात ज्ञानेश्वर माळवे यांना अकोले येथे खिरविरे बीट मिळाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

संपुर्ण जिल्ह्यात फक्त पाच जणांना विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणुन पदोन्नती मिळाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे ज्ञानेश्वर माळवे यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,आ.किरण लहामटे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी आ.वैभव पिचड,गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत याचेसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



