जाहिरात-9423439946
निवड

साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी…यांची निवड !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेश कोंडीराम मगर यांची तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब वसंत पगारे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यांत आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेश कोंडीराम मगर यांची तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब वसंत पगारे यांची निवड झाली तो क्षण.

  

“माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पंचक्रोशीतील उस उत्पादक सभासदांच्या उत्कर्षांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची उभारणी केली  होती.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी साखर कामगारांच्या अडीअडचणी समजुन घेत त्याची सोडवणुक केली.कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ही संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी परिश्रम घेतले आहे”-सुरेश मगर,नूतन अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना पतपेढी.

   कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.यावेळी अध्यक्षपदासाठी सुरेश मगर यांच्या नावाची सुचना संचालक विलास कहांडळ यांनी मांडली तर त्यास सुदाम उगलमुगले यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी आण्णासाहेब पगारे यांच्या नावाची सुचना संचालक साईनाथ तिपायले यांनी मांडली तर त्यास केशव बटवाल यांनी अनुमोदन दिले आहे.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कोपरगांव तालुका सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी राजेंद्र रहाणे हे होते.
       
   दरम्यान सुरुवातीला पतपेढीचे व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करत नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षांचा सत्कार केला आहे.

   सदर प्रसंगी सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष सुरेश मगर म्हणाले की,”माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पंचक्रोशीतील उस उत्पादक सभासदांच्या उत्कर्षांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची उभारणी केली  होती.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी साखर कामगारांच्या अडीअडचणी समजुन घेत त्याची सोडवणुक केली.कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ही संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले आहे.

  दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,अध्यक्ष विवेक कोल्हे,कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,कामगार नेते मनोहर शिंदे,सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदिंनी अभिनंदन केले आहे.सदर प्रसंगी सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.तर आभार उत्तम शेळके यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close