निवड
शिक्षक भारती तालुकाध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘शिक्षक भारती’ या शासनमान्य माध्यमिक संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे प्रा.दिगंबर जयश्री अशोक देसाई यांची आगामी तीन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

"शिक्षण,समता आणि प्रतिष्ठा प्रत्येक शिक्षकाच्या वाट्याला यावी,यासाठी आपण कटिबद्ध आहोत.कोपरगाव तालुक्यातील संघटन अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल"-प्रा.दिगंबर जयश्री अशोक देसाई,नूतन कोपरगाव तालुकाध्यक्ष.
शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले आहे.या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील शिक्षक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.लोकशाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा शिक्षक भारती ही संघटना केवळ वेतन आणि भत्त्यांसाठीच नाही,तर लोकशाही,धर्मनिरपेक्षता आणि विज्ञानभिमुख समाजरचनेसाठी कटिबद्ध आहे.प्रा.देसाई यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आपल्या निवडीनंतर बोलताना प्रा.देसाई यांनी सांगितले की,”शिक्षण,समता आणि प्रतिष्ठा प्रत्येक शिक्षकाच्या वाट्याला यावी,यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तालुक्यातील संघटन अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल”. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक आ.कपिल पाटील,प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे,कार्याध्यक्ष सुभाष मोरे,विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती महिला अध्यक्ष रुपाली कुरूमकर,राज्यसचिव सुनील गाडगे,माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप,उच्च माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष रामराव काळे,संघटक चंद्रशेखर हासे आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी तसेच कोपरगाव स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत
ठोळे कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे , सहसचिव सचिन अजमेरे,डॉ.अमोल अजमेरे, आनंद ठोळे,राजेश ठोळे,अहिल्यानगर जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर बँकेचे संचालक अतुल कोताडे तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे ,उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर , पर्यवेक्षक बलभीम उल्हारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



