जाहिरात-9423439946
निवड

माजी सरपंच कोळपे यांची …या पदावर निवड

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किल्ले वाफगाव येथे दि.६ जानेवारी २०२६ रोजी श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.या महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असून त्यासाठी राज्यभर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.त्यात कोपरगाव तालुका प्रतिनिधी म्हणून सुरेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिन नामदेव कोळपे यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सचिन कोळपे,नूतन तालुकाध्यक्ष.

  

यशवंतराव होळकर महाराज हे सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हरणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली होती.मध्ययुगीन काळात शेवटचे सर्वात मोठे सम्राट मानले जातात.त्यांचा राज्याभिषेक सोहळा दर 06 जानेवारी रोजी संपन्न होत असतो.

    यशवंतराव होळकर हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते.मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ च्या खर्ड्याची लढाई या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली.या युद्धात यशवंतराव आपले पिता तुकोजीराव होळकर यांचेसोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते.त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष होते.या युद्धात निजामाचा पराभव केला.यशवंत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हरणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली होती. मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे.त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती,परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.त्यांनी आपला राज्याभिषेक 06 जानेवारी 1805 रोजी केला होता.या स्मृती प्रीत्यर्थ हा उपक्रम दरवर्षी संपन्न होत असतो त्यासाठी राज्यभर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.त्यात सुरेरगावचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन कोळपे यांची निवड झाली आहे.सचिन कोळपे यांचे काम समाजासाठी लक्षवेधी आहे.महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठी वधुवर सुचक शृंखला ते चालवतात.हा सोहळा संपन्न होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वानी किल्ले वाफगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन नूतन तालुकाध्यक्ष सचिन कोळपे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close