निवड
ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी… यांची निवड !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपसह अन्य राजकीय पक्ष सावध झाले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडी जाहीर करण्यास प्रारंभ केला असून कोपरगाव तालुका अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल धोंडीबा सांगळे यांच्या पत्नी जयश्री अनिल सांगळे यांची कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून साधारणतः तीन वर्षं झाले तरी निवडणुका झालेल्या नाहीत.त्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पूर्ण प्रक्रिया चार महिन्यात संपवावी असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कान वर झाले आहे.त्यांनी आपल्या भात्यात बाण भरण्यास,घोडा,नाल मेख,तंग तोबरा भरून आपल्या कार्यकर्त्यांना हाजिर हो…! चा आदेश पारित केला आहे.परिणामस्वरूप सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आपल्या टाचा वर केल्या आहेत. व आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेश पातळीवरून जाहीर केल्या आहेत.
त्यात भाजप आघाडीवर असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशस्तरावरून ५८ जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा जुन्यांनाच संधी देण्यात आली आहे.दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांनी आता तालुका पातळीवर आपले पदाधिकारी निवडण्यास प्रारंभ केला आहे.
त्यात भाजपच्या कोल्हे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते व कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल धोंडीबा सांगळे यांच्या पत्नी जयश्री अनिल सांगळे यांची कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांचेसह जळगाव येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचेसह सोनारी,सुरेगाव,कोळपेवाडीसह तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.