जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या सेवा संस्थेच्या उपाध्यक्षपदाची निवड जाहीर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पोहेगाव खू.येथील आ.दादासाहेब शहाजी पा.रोहमारे (पोहेगाव खु.)विविध सहकारी सेवा संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ संचालक शिवाजी बाबाजी जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

ज्येष्ठ संचालक शिवाजी जगताप यांच्या नावाची सूचना गोरखनाथ पुंजाजी जाधव यांनी आणली होती त्याला संचालक संजय वसंतराव रोहमारे यांनी अनुमोदन दिले होते.एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रहाणे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे.

  कोपरगांव तालुक्यातील माजी आ.दादासाहेब शहाजी पा.रोहमारे सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश जाधव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.त्याबाबत सहकार विभागाने निवडणूक जाहीर केली होती.त्यावेळी ज्येष्ठ संचालक शिवाजी जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या रिक्त जागी उपाध्यक्षपदी शिवाजी बाबाजी जगताप यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या वेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी आर.एन.रहाणे यांनी काम पाहिले आहे.

ज्येष्ठ संचालक शिवाजी जगताप यांच्या नावाची सूचना गोरखनाथ पुंजाजी जाधव यांनी आणली होती त्याला संचालक संजय वसंतराव रोहमारे यांनी अनुमोदन दिले होते.एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रहाणे यांनी शिवाजी जगताप यांची बिनविरोध निवड जाहीर केले आहे.

   सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन रामराव रोहमारे,माजी उपाध्यक्ष सतिष बाळकृष्ण जाधव,संचालक दिपक रोहमारे,डॉ.जगदिश लक्ष्मीनारायण झंवर,अशोक लक्ष्मण रोह‌मारे,नवनाथ बाबुराव जाधव,भाऊसाहेब सोनवणे,जयंत रामराव रोह‌मारे,अजय दत्तात्रय रोह‌मारे,योसेफ विश्वनाथ भालेराव,संचालिका ललीता अभय रोहमारे,अलका विलास रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष शिवाजी जगताप यांचा अध्यक्ष सचिन रोहमारे यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे सचिन रविंद्र मारुती गुजर यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संचालक दिपक रोहमारे यांनी मानले आहे.दरम्यान नवोदित उपाध्यक्ष शिवाजी जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close