जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी अवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव शेळके यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

या निवडीच्यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत किरण साहेबराव शेळके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक संकेत शिगांडे यांनी किरण शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   लौकी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच अजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत किरण साहेबराव शेळके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक संकेत शिगांडे यांनी किरण शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

   यावेळी सरपंच,सर्व सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी मावळते उपसरपंच राहुल खंडीझोड,सदस्य कांताबाई खिल्लारी,दिपाली खटकाळे,ललिता इंगळे,अनिल आहेर,जिनींग प्रेसिग सोसायटीचे संचालक शिवाजी शेळके,राजेंद्र खिलारी,सावळेराम खटकाळे,भाऊसाहेब भवर,दिगंबर जाधव,बबनराव भवर,सागर खटकाळे,विष्णु खटकाळे,बाळासाहेब भवर,रामभाऊ खटकाळे,भागीनाथ शेळके,आबासाहेब जाधव, भाऊसाहेब गोडसे,कैलास शेळके,अनिल खटकाळे,नारायण शेळके आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व लौकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

   लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण शेळके यांची निवड होताच सरपंच,सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close