जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

पत्रकारांनी निःपक्ष होऊन आपले कर्तव्य निभावले पाहिजे-…केंद्रीय मंत्री

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


वर्तमानात अनेक समाज घटक विकासापासून वंचित आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज शिकला तरच पुढे जाऊ शकतो त्यासाठी पत्रकारांनी निःपक्ष होऊन आपले कर्तव्य निभावले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रिय लघु उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

“दिल्लीतील व्हाइस ऑफ मिडियाने आज शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघांतील चांगल्या कार्याची दखल घेऊन सत्कार केला ही अभिमानाची बाब आहे.अशा चांगल्या लोकांची दखल माध्यमांनी घेणे ही आज काळाची गरज आहे”- जितनराम मांझी,केंद्रीय लघु उद्योग मंत्री,भारत सरकार.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही.ओ. एम.इंटरनॅशनल फोरम यांच्यावतीने दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र भवन येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता त्याचे वितरण आज दुपारी १२.३० वाजता केंद्रीय लघुउद्योग मंत्री जीतनराम मांझी यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

    सदर प्रसंगी व्हाइस ऑफ मिडियाचे संस्थापक संदीप काळे,पत्रकार व राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या धर्मपत्नी सरस्वती वाकचौरे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कालवा समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,समितीचे सचिव कैलास गव्हाणे,मेजर महेंद्र सोनवणे,विलास गुळवे,सौरभ शेळके,तानाजी शिंदे,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,विजय शिंदे आदी प्रमुख मान्यवर वरांसह विविध तेरा राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सरकार ,न्यायपालिका आणि प्रशासन यात आणखी पत्रकार लोकशाहीत चौथे मोठे स्थान आहे.या संघटनेमार्फत सकारात्मक बातम्यांचे काम केले जात आहे.पत्रकार आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन दिले जात आहे.पत्रकारांच्या समस्या सोडवल्या तर ते समाजातील विविध समस्यांना वाचा फोडू शकतात.पत्रकारांचे कार्य गरिबांच्या झोपडीपर्यंत जाणे गरजेचे आहे.पत्रकारांनी निःपक्ष होऊन आपले कर्तव्य निभावले पाहिजे.आजही अनेक समाज घटक विकासापासून वंचित आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज शिकला तरच पुढे जाऊ शकतो.मेघालय असे राज्य आहे की तेथे सर्व लोक साक्षर आहे.त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी काम करणे गरजेचे आहे.आपण ज्या समाजातून आलो आहे त्याला या शिक्षणाची गरज आहे.शिक्षणाच्या अभावाने कोणाचाही विकास होऊ शकत नाही.त्यावेळी व्हाइस ऑफ मिडियाचे आज शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन सत्कार केला ही अभिमानाची बाब आहे.चांगल्या लोकांची दखल माध्यमांनी घेणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

   सदर प्रसंगी प्रास्ताविक अनिल म्हस्के यांनी केले तर सूत्रसंचालन यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार पत्रकार कुमार कडलग यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close