निवड
…या ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुमन मधुकर थोरात यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अकरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पंचाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आवर्तन ठरलेले आहे.त्यानुसार एक वर्षांनी एका सदस्याची सरपंच पदावर बिनविरोध निवड होत असते.यापूर्वीच्या सरपंच रंजना भीमाशंकर थोरात यांनी त्यांच्या पदाचा आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. त्यासाठी मंडळ अधिकारी बी.जी.तौर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले आहे.यावेळी ग्रामसेवक प्रमोद शिरोळे,तलाठी बापू राठोड,पोलीस पाटील नवनाथ थोरात उपस्थित होते.
दरम्यान विहित वेळेमध्ये सरपंच पदासाठी सुमन मधुकर थोरात यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला.उपसरपंच महेश थोरात यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली.सदर सुचनेस सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सर्वानुमते अनुमोदन देण्यात आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तौर यांनी जाहीर केले. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच सुमन थोरात यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच निवडीच्या निमित्ताने आयोजित ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपसरपंच महेश थोरात,रंजना थोरात,अनिता थोरात,उषाताई थोरात,विठाबाई थोरात, सिंधुबाई सैंद्रे,भारत वाघ,प्रकाश थोरात,दुलाजी थोरात, बाळू मोरे या सदस्यासह तंटामुक्ती अध्यक्ष जयराम थोरात,ग्रामस्थ कैलास थोरात,रावसाहेब थोरात,बाळासाहेब थोरात, रामनाथ थोरात,छबु थोरात,सुनील थोरात,जालिंदर थोरात, गणेश थोरात,विवेक थोरात, संतोष बेलोटे, संदीप थोरात, नारायण थोरात, लक्ष्मण थोरात, पोपट थोरात, अरुण थोरात, पंडित थोरात, संपत थोरात,रेवळनाथ थोरात, चांगदेव सैंद्रे, बबन शिरसाठ, शंकर थोरात शांताराम आसळक, दिगंबर चव्हाण, हिरामण थोरात, गौरव थोरात, नंदू बेलोटे,सीताराम फटांगरे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.