जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…यांनी केला उपमुख्यमंत्र्याचा सत्कार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी व राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव सचिन मुजगुले यांनी त्यांचा सत्कार केला असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या असल्याची  माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून नगर जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते सचिन मुजगुले हे ओळखले जातात.त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून मुंबईला धाव घेऊन त्यांचा सत्कार केला आहे.

   मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सहा वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अजित पवार यांची यंदाही आपल्या ४१ आमदार निवडून आणून आपल्या सामर्थ्यावर उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लावली आहे.राजकारणातील अनेक वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले आहे,पण बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची राज्याला ओळख आहे.त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.नवोदित उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात एक कडवट प्रशासक म्हणून ओळखले जातात.त्यांचे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारण शिकले.सन-२०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री बनले.त्यानंतर जवळपास चारवेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

  महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची परंपरा १९७८ पासून सुरू झाली होती.नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री.त्यानंतर विविध काळात अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले.अजित पवार यांनी या पदावर एकूण सहा वेळा काम केले आहे,जो एक विक्रम आहे.त्यांची लोकप्रियता उत्तोरोत्तर वाढत आहे.त्यातच त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून नगर जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते सचिन मुजगुले हे ओळखले जातात.त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून मुंबईला धाव घेऊन त्यांचा सत्कार केला आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close