निवड
….या वकील संघाचे सर्व प्रश्न सोडविणार -आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरु असल्यामुळे तीन मजली न्यायालयात सर्वच न्यायालयांचे काम सुरु आहे.त्यामुळे या न्यायालयाच्या इमारतीमध्ये लिप्ट बसवावी या प्रमुख मागणीसह वकील संघाचे सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे.
कोपरगाव वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.यामध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.अशोकराव वहाडणे, उपाध्यक्षपदी अॅड.रमेश गव्हाणे,महिला उपाध्यक्षपदी अॅड.स्वाती मैले,सचिवपदी अॅड.राहुल चव्हाण,सहसचिवपदी अॅड.प्रताप निंबाळकर व खजिनदारपदी अॅड.दीपक पवार या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.आशुतोष काळे यांनी सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी वकील संघाचे बार अध्यक्ष अॅड.अशोकराव वहाडणे,उपाध्यक्ष अॅड. रमेश गव्हाणे,महिला उपाध्यक्ष अॅड.स्वाती मैले,सचिव अॅड.राहुल चव्हाण, सहसचिव अॅड.प्रताप निंबाळकर व खजिनदार अॅड. दीपक पवार यांचेसह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर ३८.६३ कोटी निधीतून नवीन सुसज्ज न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेल्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये सध्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय,सिनिअर डिव्हिजन, ज्यू.डिव्हिजन आदी विभागाच्या न्यायालयांचे काम सुरु असून तिसऱ्या मजल्यावर न्यायालयीन कामकाजासाठी जिना चढून जातांना ज्येष्ठ वकील बांधवांना होत असलेल्या त्रासाची मी कल्पना करू शकतो.त्यामुळे या न्यायालयाच्या इमारतीसाठी लिप्ट बसविण्याची बार असोसिएशनची मागणी योग्य असून त्याबाबत निश्चीतपणे पाठपुरावा करून हि अडचण लवकरात लवकर दूर करू.तसेच सर्व वकील बांधवांना येणाऱ्या इतरही अडचणी सोडवू अस आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.
“वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर न्यायालयाच्या आवारात येवून पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणारे आ.आशुतोष काळे पहिले लोकप्रतिनिधी आहेत.त्यांनी अतिशय चांगली प्रथा पाडली असून कोपरगाव बार असोसिएशनला काम करण्यासाठी निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे”-अॅड.शिरीष लोहोकणे,वकील कोपरगाव.