निवड
…या प्राध्यापकांची…या संस्थेवर निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालय कोपरगांव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ.संजय दवंगे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम.ए.हिंदी शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमाच्या स्वयंअध्ययन साहित्य लेखन कार्यासाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.सध्या सर्वच विद्यापीठांमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले जात असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेमार्फत हिंदी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम विकसित करण्यात येत आहे.डॉ.संजय दवंगे यांचा अध्ययन अध्यापन व संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभव व व्यासंग विचारात घेऊन त्यांची या कामी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.दवंगे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांचे आतापर्यंत २४ शोध लेख मान्यताप्राप्त पत्रिकेत प्रकाशित झालेले असुन यूजीसी संस्थेअंतर्गत एक लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला आहे.
डॉ.दवंगे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांचे आतापर्यंत २४ शोध लेख मान्यताप्राप्त पत्रिकेत प्रकाशित झालेले असुन यूजीसी संस्थेअंतर्गत एक लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला आहे.विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लक्षवेधी विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य,शाखा कोपरगांव चे कार्याध्यक्ष म्हणुनही त्यांचे साहित्यिक कार्य प्रशसनीय आहे.ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचेही ते सदस्य आहेत.त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.एस.डी.कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे,पत्रकार सचिन धर्मापुरीकर,लक्ष्मण जावळे आदींनी अभिनंदन केले आहे.