निवड
कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यासह राज्यात सहकार बँकात अग्रणी असलेल्या कोपरगांव पिपल्स को-ऑप.बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र मोतीलाल शिंगी यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“नूतन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंगी हे गेल्या १४ वर्षापासुन बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असुन त्यांनी या कालावधीत बँकेचे उपाध्यक्षपद भुषविलेले आहे.एकंदरीत बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व लाभल्यामुळे यापुढील काळातही त्यांच्या अनुभवाचा बँकेस निश्चित फायदा होईल”-कैलास ठोळे,मावळते अध्यक्ष,कोपरगाव पीपल्स बँक.
कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षते खाली नूतन अध्यक्ष निवडीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्या सभेत निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष पदाची सुचना धरमकुमार माणकलाल बागरेचा यांनी मांडली त्यास कल्पेश जयंतीलाल शहा यांनी अनुमोदन दिले होते.अध्यक्ष पदा करीता एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहाय्यक निबंधक ठोंबळ यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान नूतन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंगी हे गेल्या १४ वर्षापासुन बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असुन त्यांनी या कालावधीत बँकेचे उपाध्यक्षपद भुषविलेले आहे.एकंदरीत बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व लाभल्यामुळे यापुढील काळातही त्यांच्या अनुभवाचा बँकेस निश्चित फायदा होईल असे गौरवोदगार मावळते अध्यक्ष कैलास ठोळे यांनी काढले आहे.
यावेळी झालेल्या सभेत बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे,संचालक रविंद्र लोहाडे,अतुल काले,सत्येन मुंदडा, सुनिल बंब,रविंद्र ठोळे,दिपक पांडे,सुनिल बोरा,हेमंत बोरावके,वसंतराव आव्हाड,संचालीका प्रतिभा शिलेदार,त्रिशला गंगवाल मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक महाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड यांनी केले तर उपस्थितांचे बँकेचे संचालक अतुल काले यांनी आभार मानले आहे.