जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

आरोग्य रक्षकांनी अनेकांचे प्राण वाचवले-…या नेत्याची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

  कोरोना साथीच्या कालखंडात आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,अंगणवाडी सेविका,आशासेविका आदीं आरोग्य रक्षकांनी अनेकांचे प्राण वाचले असल्याचे प्रतिपादन महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   

जागतिक कोरोना साथ मोठी प्रतिकूल ठरली होती.त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते.या प्रतिकूल काळातही आपले जीवित धोक्यात घालून अनेकांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले होते.त्यात डॉक्टर,परिचारिका,समाजसेवक,अंगणवाडी सेविका,आशाताई आदींचा उल्लेख केला जातो त्यांना नुकतेच संवत्सर येथे सन्मानित केले आहे.

जागतिक कोरोना साथ मोठी प्रतिकूल ठरली होती.त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते.या प्रतिकूल काळातही आपले जीवित धोक्यात घालून अनेकांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले होते.त्यात डॉक्टर,परिचारिका,समाजसेवक,अंगणवाडी सेविका,आशाताई आदींचा उल्लेख केला जातो.संवत्सर येथील अंगणवाडी सेविका,आशाताई त्यास अपवाद नव्हत्या.त्याची दखल संवत्सर येथील ग्रामपंचायत अपवाद नव्हती.त्यांना दिपावली निमित्त या लढ्यातील शिलेदार ठरलेल्या अंगणवाडी सेविका व आशाताई आदींचा दिवाळी निमित्त नुकताच पैठणी देऊन राजेश परजणे यांच्या हस्ते सत्कार केला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,चंद्रकांत लोखंडे लक्ष्मणराव साबळे लक्ष्मणराव परजणे,दिलीप ढेपले,शिवाजी गायकवाड,बाजार समितीचे संचालक खंडू पाटील फेपाळे, सोमनाथ निरगुडे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,ज्ञानेश्वर कासार,हबीब तांबोळी,दिलीप तिरमखे,कृष्णा अहिरे ग्रामविकास अधिकारी श्री अहिरे,अंगणवाडी सेविका तसेच आशाताई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”सन-१९९४-९५ पासून संवत्सर गावच्या विकासामध्ये सर्वांचेच योगदान आहे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात त्यांच्या गरजा ग्रामपंचायतीमार्फत पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो चालू वर्षी महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावे तसेच महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांसाठी दिवाळी व दसरा या सणासाठीआनंदाचा शिधा हा देखील वाटप करण्यात आला सर्व गोरगरीब लोकांनी सोसायटी मधून आनंदाचा शिधा घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविक केले आहे तर उपस्थितांचे आभार लक्ष्मण साबळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close