निवड
…या भजनीं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
नुकत्याच संपन्न झालेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने धामोरी येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भजणी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प.नवनाथ कदम तर सचिवपदी राजेंद्र बारे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी गौतम बँकेच्या एक्झिक्युटिव्ह संचालक पदी शामराव माळी यांची निवड झाल्याबद्दल मंडळाचा वतीने शिवाजी दवंगे यांनी सत्कार केला आहे.
श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोजागिरी पौर्णिमे निमित्त मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.सभेच्या अध्यक्षतेस्थानी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हभ.प.दगुराव वाणी होते.
सदर प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून हभ.प.प्रकाश गोपीनाथ जेजुरकर तर उपकार्याध्यक्ष म्हणून भाऊसाहेब नाजगड,अध्यक्षपदी नवनाथ कदम,उपाध्यक्ष पदी बाळासो वाघ तर सचिव पदी राजेंद्र बारे,खजिनदार पडती सचिन ताजने तर मार्गदर्शक म्हणून दगू वाणी,खंडेराव क्षिरसागर,पंडित हाराळे आदींची निवड करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी गौतम बँकेच्या एक्झिक्युटिव्ह संचालक पदी शामराव माळी यांची निवड झाल्याबद्दल मंडळाचा वतीने शिवाजी दवंगे यांनी सत्कार केला आहे.
सदर प्रसंगी भजनी मंडळाचे सारंगधर सोनवणे,सुदाम बागुल,हरिभाऊ दरेकर, काचरू वाणी,वाल्मीक जेजुरकर,रावसाहेब जगताप,छायाताई महाराज लाड,कुंदामामी मोरे,मीनाताई सोनवणे,शोभाताई माळी,योगेश पगार,बाबासाहेब गांगुर्डे,तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आहे.शेवटी रावसाहेब जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.