निवडणूक
कोपरगाव बाजार समिती निवडणूक सत्ताधाऱ्यांना जाणार जड !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत आज चिन्ह वाटप करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप तथा आ.काळे व माजी आ.कोल्हे व पराजणे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला, ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले आहे तर विरोधी,’परिवर्तन पॅनल’च्या आघाडीला ‘बॅट’ हे चिन्ह दिले असून अन्य उमेदवारांना गिटार,ट्रॅक्टर,हॉकी स्टिक,बादली,अंगठी,किटली,घड्याळ,बसगाडी,कपाट,कांदा,नारळ,छत्री,ऍटो रिक्षा आदी चिन्हे प्रदान केली आहेत.मात्र व्यापारी व हमाल-मापाडी मतदार संघात सत्ताधारी गटास उमेदवार प्राप्त झाले नाही हे विशेष ! आता प्रचाराचा नारळ केंव्हा फुटणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान या निवडणुकीत विरोधी गटाच्या अनेक उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी ईशान्य गडावरील युवा नेत्याने अखेर पर्यंत खिंड लढवली होती मात्र त्याला यश आले नाही व विरोधी आघाडी ना-ना म्हणता तयार झाली आहे.तरीही त्यांनी माघारीची इच्छा असताना तिला शिवसेनेने सावध होत जास्तीचे उमेदवार शिल्लक ठेवल्याने त्याची किंमत त्यांना अखेर पर्यंत मोजावी लागणार आहे.मात्र सत्ताधारी गटाने आपल्या अनेक इच्छुकांना उमेदवारीसाठी विचारणा केली नसल्याचे अनेक प्रकरणात उघड झाले आहे.त्यामुळे या नाराजीची किंमत सत्ताधारी वर्गाला चुकवावी लागणार असल्याचे दिसू लागले आहे.त्यामुळे सत्ताधारी गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काल नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १०४ पैकी ६३ उमेदवारांनी मागे घेतले असून ०३ जागा बिनविरोध झाल्या असून १५ जागेसाठी आता रिंगणात ३८ जण आपले भविष्य आजमावत असून यात शिवसेनेने आपले ०९ उमेदवार रिंगणात ठेवल्याने त्यांनी प्रस्थापित काळे-कोल्हे,परजणे-औताडे युतीच्या ‘शेतकरी विकास पॅनल’पुढे गंभीर आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे आता ही दुरंगी लढत तब्बल १५ वर्षांनी रंगणार असून याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान बिनविरोध झालेल्या तीन जागांत आर्थिक दुर्बल घटकांत पोहेगाव येथील कार्यकर्ते नवले अशोक,अनुसूचित जाती जमाती मध्ये वेळापूर येथील मोकळ रावसाहेब रंगनाथ,भटके विमुक्त मधून जेऊर पाटोदा येथील केकाण रामदास भिकाजी यांनी बाजी मारली आहे.बाकी पंधरा जागा लढवल्या जात आहेत.मात्र यातील अनेक उमेदवारांना मागे घेण्यासाठी ईशान्य गडावरील युवा नेत्याने अखेर पर्यंत खिंड लढवली होती मात्र त्याला यश आले नाही व विरोधी आघाडी ना-ना म्हणता तयार झाली आहे.तरीही त्यांनी माघारीची इच्छा असताना तिला शिवसेनेने सावध होत जास्तीचे उमेदवार शिल्लक ठेवल्याने त्याची किंमत त्यांना अखेर पर्यंत मोजावी लागणार आहे.मात्र सत्ताधारी गटाने आपल्या अनेक इच्छुकांना उमेदवारीसाठी विचारणा केली नसल्याचे अनेक प्रकरणात उघड झाले आहे.त्यामुळे या नाराजीची किंमत सत्ताधारी वर्गाला चुकवावी लागणार असल्याचे दिसू लागले आहे.अनेक निवडणुकात आपल्या कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याचे सत्ताधारी वर्गाचे गणित या वेळी त्यांना चांगलेच अडचणीत आणणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसू लागले आहे.त्यातले त्यात शिवसेना हा पक्ष कोणीही आत येऊन सेनेचा कळस कापून नेण्यासाठी प्रसिद्ध झाली असून यावेळीही त्यांना किंमत चुकवावी लागली आहे.औताडे गट असाच भोवला आहे.त्यामुळे निष्ठावान गट नाराज झाला आहे.त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.त्यामुळे याची किंमत चुकवावी लागणार आहे.वरिष्ठ नेत्यांनी आता याची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे बनले असल्याचे मानले जात आहे.
सोसायटी मतदार संघ
सत्ताधारी काळे-कोल्हे,परजणे गटाच्या,’शेतकरी विकास पॅनल’च्या सोसायटी मतदार संघाचे ‘कपबशी’ चिन्ह असलेले उमेदवार पुढील प्रमाणे-
गोर्डे बाळासाहेब गंगाधर,देवकर शिवाजी बाबुराव,परजणे गोवर्धन बाबासाहेब,रोहोम साहेबराव किसन,लामखडे साहेबराव शिवराम,शिंदे लक्ष्मण विश्वनाथ,शिंदे संजय माधवराव आदी आहेत.
तर विरोधी ‘परिवर्तन’ गटाचे गव्हाणे रंगनाथ सोपान,गवळी राहुल सुरेश,चांदगुडे किरण मधुकर,जाधव विजय सुधाकर,टेके रावसाहेब चांगदेव आदींचा समावेश आहे.
तर अपक्ष उमेदवार आसने कैलास भीमा-गिटार,पवार धनराज मनसुख-ट्रॅक्टर,तर पवार विष्णू नानासाहेब-हॉकी स्टिक,घेगडमल देवराम रामभाऊ-बादली आदींचा समावेश आहे.
महिला राखीव मतदार संघ-
सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे काळे-कोल्हे-परजणे गटाचे ‘कपबशी’चे उमेदवार पुढील प्रमाणे-
कदम मीरा सर्जेराव,डांगे माधुरी विजय आदींचा समावेश आहे.तर विरोधी ‘परिवर्तन’आघाडीचे बॅटचे उमेदवार पुढील प्रमाणे- जावळे गयाबाई धर्मा या एकमेव उमेदवार आहेत.
तर अपक्ष उमेदवार बारहाते हिराबाई रावसाहेब,चिन्ह-अंगठी आदींचा समावेश आहे.
इतर मागासवर्ग मतदार संघ-
सत्ताधारी ‘शेतकरी विकास पॅनल’चे आघाडीचे ‘कपबशी’चे उमेदवार पुढील प्रमाणे-
फेफाळे खंडू पुंजाबा यांचा समावेश आहे.तर विरोधी परिवर्तन पॅनल ‘बॅट’ चे उमेदवार-पवार गिरीधर दिनकर यांचा समावेश आहे.तर अपक्ष उमेदवार बिडवे दत्ता नामदेव-किटली आदींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत मतदार संघ-
सत्ताधारी काळे-कोल्हे-परजणे शेतकरी पॅनलचे ‘कपबशी’चे उमेदवार-
गोर्डे प्रकाश नामदेव,निकोले राजेंद्र शंकर आदींचा समावेश आहे.
तर विरोधी,’परिवर्तन पॅनल’चे ‘बॅट’ चिन्ह असलेले उमेदवार पुढील प्रमाणे-
दंडवते संजय काशिनाथ,पाडेकर विष्णू एकनाथ आदींचा समावेश आहे.
व्यापारी आडते मतदार संघ उमेदवार-
सत्ताधारी गटास उमेदवार नसल्याचे दिसून आले आहे हे मोठे अपयश मानले जात आहे.तर विरोधी,’परिवर्तन पॅनल’चे ‘बॅट’ चिन्ह असलेले उमेदवार पुढील प्रमाणे-कोठारी सुनील कुमार गोकुलचंद,ठक्कर संतोष मंगलदास तर अपक्ष उमेदवार पुढील प्रमाणे-खान नदीम अहमद रियाज अहमद-घड्याळ,धाडीवाल ललीतकुमार तेजमल-विमान,निकम रेवणनाथ श्रीरंग-बैलगाडी,भट्टड संजय शामलाल-शिट्टी,श्याम मनीष जयंतीलाल-कपाट,सांगळे ऋषिकेश मोहन-कांदा आदींचा समावेश आहे.
हमाल-मापाडी मतदार संघ उमेदवार-
मरसाळे अर्जुन भगवान-नारळ,शेळके जलदीप भाऊसाहेब-छत्री,साळुंके रामचंद्र नामदेव-अटो रिक्षा आदींचा समावेश आहे.आता सत्ताधारी व विरोधी पॅनल आपल्या प्रचाराचा नारळ केंव्हा फोडणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.