निवडणूक
पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी पुन्हा सुरु होणार !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाकडील १४ जुलै,२०२२ रोजीच्या पत्रानुसार ०१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे.लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-१९५० चे कलम-२२ व २३ मधील तरतुदीनुसार निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार याद्या अदयावत करण्यासाठी खुल्या राहतील अशी तरतूद आहे.
“नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२२-२३ करिता नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी,२०२३ हा आहे.भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रातील सुचनांप्रमाणे नाशिक विभाग पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त पदवीधर मतदार नोंदणी अर्जावर कार्यवाही करुन मतदार यादी अद्यावत करण्यात येईल”-रमेश काळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,नाशिक पदवीधर मतदार संघ.
तथापि,भारत निवडणूक आयोगाकडील दि.०३ जानेवारी,२०२३ रोजीच्या पत्रातील मागदर्शक सुचनांप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या १० दिवसापुर्वी पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करता येईल असे कळविण्यात आले आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२२-२३ करिता नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी,२०२३ हा आहे.भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रातील सुचनांप्रमाणे नाशिक विभाग पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त पदवीधर मतदार नोंदणी अर्जावर कार्यवाही करुन मतदार यादी अद्यावत करण्यात येईल असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.