जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या शहरात १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपालिका हद्दीत १५ जानेवारी २०२३ पर्यंत मतदान यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी मतदार केंद्रीयस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कामकाज करावे असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी गोविंद शिंदे यांनी नुकतेच येथे केले‌ आहे.

“राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही या मोहीमेसाठी बीएलओंना सहकार्य करावे.यासाठी बीएलओंसोबत आपला एक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात यावी.‌विशेष मोहिमेनंतर यादी बाबत हरकती ऐकून घेण्यात येणार नाहीत”-गोविंद शिंदे,प्रांताधिकारी,शिर्डी.

शिर्डी नगरपालिका हद्दीतील मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांची (बीएलओ) बैठक नगरपालिका सभागृहात श्री.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते‌.राहाता तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,नायब तहसीलदार विकास गंबरे व सुधाकर ओहोळ यावेळी उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले,आता दर तीन महिन्यांनी मतदार याद्यांचे प्रकाशन होणार असल्याने ‘बीएलओ’ यांनी दक्ष राहून कामकाज करावे. आगामी काळात नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने याद्या बिनचूक असणे आवश्यक आहे.यासाठी बी.एल.ओं.सोबत नगरपालिका कर्मचारी यांची यादी भागनिहाय नियुक्ती करून विशेष मोहीम स्वरूपात मतदार यादी पडताळणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात यावी.

मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारी,आधार व मतदार ओळखपत्र संलग्नीकरण कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. शिर्डी हद्दीतील काही मतदार स्थलांतरित झाले असून त्यांची नावे पडताळणी करणे,दुबार नावे तपासणी, मयत नावे वगळणे या कामांचा आढावा घेण्यात आला.युवा मतदार,नवीन नाव नोंदणी,नाव अथवा इतर तपशील बदल याबाबत दुरुस्ती करावी अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बीएलओंना‌ यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close