जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावातील ग्रामपंचायत उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात आता ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या उपसरपंच पदाची निवडणूक येत्या २९,३० आणि ३१ डिसेंबर रोजी अशा तीन टप्प्यात जाहीर जाहीर झाली झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.त्यात पहिल्या टप्प्यात १३ दुसऱ्या टप्प्यात ०८ तर तिसऱ्या टप्प्यात ०५ ग्रामपंचायतीची निवडून संपन्न होणार आहे.त्यामुळे राजकीय अपक्ष आणि त्यांचे सहकारी आपल्या आकड्यांची जमवाजमव करण्यात सक्रिय झाले आहे.

राज्यातील “ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या;तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्या होत्या अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठीकाणी तिरंगी लढती संपन्न झाल्या असून विद्यमान राष्ट्रवादीस पंधरा तर भाजपला नऊ जागा तर एक उद्धव सेना तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल निर्माण झाले आहे.

दरम्यान आता सरपंच पद थेट जनतेतून असल्याने तो विषय बाजूला पडला असला तरी आता दुय्यम पद म्हणून उपसरपंच पदास महत्व प्राप्त झाले असून त्यासाठी ग्रापंचायत सदस्य आणि त्यांचे पाठीराखे सक्रिय झाले आहे.

दरम्यान दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या टप्प्यात प्रथमसभा पार पडत असलेली ग्रामपंचायतीचे नाव,त्यांची संपत असलेली मुदत व पुढे निवडणूक अधीकारी पुढे दर्शवले आहेत.

भोजडे-१४ नोव्हेंबर २०२२,(निवासी नायब तहसीलदार कोपरगाव ) सडे-२३ नोव्हेंबर २०२२,(नायब तहसीलदार,कोपरगाव),
शिंगणापूर-२३ नोव्हेंबर (सहाय्यक गटविकास अधिकारी),वेस-सोयगाव-१४ नोव्हेंबर (नायब तहसीलदार),कोळपेवाडी-१४ नोव्हेंबर (सहाय्यक शाखा अभियंता म.जी.प्रा.उपविभाग कोपरगाव),वडगाव-१२ नोव्हेंबर (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव),मोर्विस-१२ नोव्हेंबर (तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव),खिर्डी गणेश-१२ नोव्हेंबर (संजय गांधी नायब तहसीलदार,कोपरगाव),पढेगाव-१२ नोव्हेंबर (गट शिक्षण अधिकारी पं.स.कोपरगाव),चासनळी-१२ नोव्हेंबर (उपअधीक्षक,भूमिअभिलेख,कोपरगाव),माहेगाव देशमुख-१४ नोव्हेंबर (सहा.अभियंता,उपविभाग पाटबंधारे,कोपरगाव),रांजणगाव देशमुख-१२ नोव्हेंबर (उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,कोपरगाव),शहापूर-१२ नोव्हेंबर (उप अभियंता,जि.प.ल.पा.सार्व.बांधकाम उपविभाग,कोपरगाव),आदी तेरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ३० डिसेंबर रोजी पुढील उपसरपंच निवडणूक संपन्न होत असून त्यातील गावांची नावे मुदत संपणारी तिथी व निवडणूक अधिकारी दर्शवले आहे.
बहादराबाद-१२ नोव्हेंबर,(निवासी नायब तहसीलदार कोपरगाव),डाऊच बु.-१२ नोव्हेंबर,(निवडणूक नायब तहसीलदार कोपरगाव),डाऊच खु.-१२ नोव्हेंबर,(सहाय्यक गटविकास अधिकारी,कोपरगाव),देर्डे कोऱ्हाळें-१२ नोव्हेंबर,(महसूल नायब तहसीलदार,कोपरगाव),हंडेवाडी-१४ नोव्हेंबर,(संजय गांधी नायब तहसीलदार,कोपरगाव),बक्तरपूर-१२ नोव्हेंबर,(गटशिक्षण अधिकारी पं.स.कोपरगाव),करंजी-१२ डिसेंबर,उपविभाग सार्वजनिक बांधकाम कोपरगाव.बहादरपूर-१७ डिसेंबर,उपविभाग जि.प.ल.पा.सार्वजनिक बांधकाम कोपरगाव.आदी आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

दरम्यान तिसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर रोजी पुढील उपसरपंच निवडणूक संपन्न होत असून त्यातील गावांची नावे मुदत संपणारी तिथी व निवडणूक अधिकारी दर्शवले आहे.
तळेगाव मळे-३० डिसेंबर,(महसूल नायब तहसीलदार,कोपरगाव),चांदेकसारे-३० डिसेंबर,(सहा.निबंधक सहकारी संस्था,कोपरगाव),धारणगाव-३० डिसेंबर,(तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव),सोनेवाडी-३० डिसेंबर,(उपअधीक्षक भूमिअभिलेख,कोपरगाव),खोपडी-३० डिसेंबर,(सहा.अभियंता उपविभाग पाटबंधारे उपविभाग कोपरगाव) आदी पाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close