जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी…इतके मतदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक आज मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.आज झालेल्या निवडणुकीत एकूण आज ५७ हजार ३१० हजार मतदारांपैकी २३,९०२ पुरुष तर २१ हजार ६२६ स्रिया असे एकूण ४५ हजार ५२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्याची सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० पर्यंतची वाजता आकडेवारी प्राप्त झाली असून त्यात ८१.४४ पुरुष तर ७७.३५ टक्के स्रिया असे एकूण ७९.४४ टक्के मतदारांनी आपले कर्तव्य बजावले आहे.कोपरगाव तहसील हद्दीत कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती नाही.त्यामुळे तालुका प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीत काळे-कोल्हे याना प्रथमच सरपंचपदांसाठी कार्यकर्त्यांवरील विश्वास कमी झालेला आढळला असून त्यांनी या वेळी सहकारातील कर्मचाऱ्यांवर जास्त भिस्त ठेवल्याचे लक्षात आले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्यावरील नेत्यांचा विश्वास कमी झाल्याचे आढळले की,नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित केले आहे हे लवकरच लक्षात येणार आहे.

राज्यातील “ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या;तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्या होत्या अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठीकाणी तिरंगी लढती संपन्न झाल्या आहेत.वेस-सोयगाव,करंजी,खिर्डी गणेश आदी ठिकाणी मात्र तिरंगी लढती झाल्याचे दिसून आले आहे.पुढे गावाचे नाव व दुपारी ५.३० पर्यंत झालेले मतदान व टक्केवारी दर्शवली आहे.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान अधिकार बजावताना आ.आशुतोष काळे दिसत आहे.

भोजडे-१८३१-७८.७५,सडे-१०४६,९३.३९,शिंगणापूर-४४३०,६४.७२,वेस-सोयगाव-१६१३,८५.२१,कोळपेवाडी-३६८०,७७.४६,वडगाव-९६८,८७.२९,मोर्विस-७४८,९१.८९,खिर्डी-गणेश-१७२४,८३.४९,पढेगाव-१९९२,८६.०८,चासनळी-१९६९,७०.०२५,माहेगाव-देशमुख-२७३१,७९.८८,रांजणगाव-देशमुख-२७७९,८६.०४,शहापूर-९२७,८८.७९,बहादराबाद-८४१,९२.८३,डाऊच-बु.-८७४,८८.८२,डाऊच-खु.-१३७१,९१.२२,देर्डे-कोऱ्हाळे-१४१२,८३.२१,तळेगाव-मळे-१०७२,८८.८९,चांदेकसारे-१७८२,४९.४६,धारणगाव-१९४७,८५.०२,हंडेवाडी-५६१,९१.६७,बक्तरपूर-७८८,८०.४९,सोनेवाडी-३१३४,८४.०२,खोपडी-९९३-९०.८५,करंजी-बु.-२६६५,८२.९४,बहादरपूर-१६५०,९३.३३ टक्के आदींचा समावेश आहे.तर २६ ग्रामपंचायतींपैकी ८ जण बिनविरोध निवडून आले होते.तर या निवडणूक रिंगणात सदस्य पदासाठी ५७१ तर सरपंच पदासाठी ८५ जण रिंगणात उरले होते त्यांचे भविष्य आज पेटीबंद झाले आहे.

दरम्यान वेस-सोयगाव शिवाय खिर्डी गणेश,(काळे,कोल्हे स्वतंत्र तर परजणे गट स्वतंत्र) वडगाव,(काळे गटाचे दोन गट त्यातील एकास परजणे गटाची साथ तर कोल्हे गट स्वतंत्र) माहेगाव देशमुख,(काळे,कोल्हे,प्रहार संघटना) करंजी (काळे,कोल्हे स्वतंत्र आणि उद्धव सेना गट) आदी ठीकाणी तिरंगी लढत झाली आहे.

या शिवाय मोठ्या असलेल्या शिंगणापूर,कोळपेवाडी,रांजणगाव देशमुख,सोनेवाडी या राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या ग्रामपंचायतीत पारंपरिक काळे-कोल्हे यांच्यात लढत रंगली होती.या निवडणुकीत काळे-कोल्हे याना प्रथमच सरपंचपदांसाठी कार्यकर्त्यांवरील विश्वास कमी झालेला आढळला असून त्यांनी या वेळी सहकारातील कर्मचाऱ्यांवर जास्त भिस्त ठेवल्याचे लक्षात आले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्यावरील नेत्यांचा विश्वास कमी झाल्याचे आढळले की,नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित केले आहे हे लवकरच लक्षात येणार आहे.कारण आता विकास कामाचा निधी सत्तर टक्के ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होऊ लागला आहे.तर जिल्हा परिषदेकडे केवळ तीस टक्के निधी उरला आहे.हे त्या मागील इंगित आहे.

आगामी काळात मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाचे घोडे पुढे जाणार हे येत्या मंगळवारी दि.२० डिसेंबर रोजी निष्पन्न होणार आहे.त्याकडे आत मतदार आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close