निवडणूक
…या पंचायत समिती १२ गणांसाठी १३ जूलै रोजी सोडत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांची आरक्षण सोडत १३ जूलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ६ गण महिलांसाठी राखीव आहेत.यात अनुसूचित जाती २ (१ महिला),अनुसूचित जमाती १ (फक्त महिला),सर्वसाधारण ९ (४ महिला) अशी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.राहता पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली जाणार आहे.
राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ६ गण महिलांसाठी राखीव आहेत.यात अनुसूचित जाती २ (१ महिला),अनुसूचित जमाती १ (फक्त महिला),सर्वसाधारण ९ (४ महिला) अशी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.राहता पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही शेवटी तहसीलदार हिरे यांनी केले आहे.