जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावसह राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.

गतवेळी नगराध्यक्ष निवडणूक जनतेतून झाल्याने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे १८ हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते.तर काळे-कोल्हे गटाला दिवसा अस्मान दाखवले होते.त्यामुळे नवीन सरकार आल्याने ही निवडणूक जनतेतून होईल असा अंदाज असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कमी पावसाच्या प्रदेशातील नगरपरिषदेच्या निवडणूका संपन्न होणार असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची झोप उडणार आहे.

राज्यातील १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.

यात कोपरगाव,राहता नगरपरिषदेचाही समावेश असल्याची माहिती शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.मात्र शिर्डी नगरपरिषदेचा मात्र त्यात समावेश नाही.त्यामुळे कोपरगाव,राहाता नगरपरिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै
उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट रोजी घोषित होणार आहे.

राज्यात शिवसेनेत नुकतेच मोठे राजकीय बंड झाले असून त्यातून मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी,काँग्रेस शिवसेना हे महाघाडीच्या वतीने एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने कोपरगाव नगरपरिषद हद्दीत याचे कोणते पडसाद उमटणार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.असेही सेनेत काळे,कोल्हे सेना अशी विभागणी झालेली होतीच आता आणखी यातून पुन्हा शिंदे गटाला किती जण सामील होणार हा महत्वाचा प्रश्न ठरणार आहे.

कोपरगाव शहरातील राजकीय क्षितिजावर पारंपरिक विरोधक (?) आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे यांचे दोन गट दावेदार असले तरी यावेळी भाजपचा निष्ठावान असलेला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा गट ही निवडणूक सर्व शक्तीनिशी लढवणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे ही लढाई लक्षवेधी ठरणार असल्याचे दिसत आहे,.

गतवेळी नगराध्यक्ष निवडणूक जनतेतून झाल्याने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे १८ हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते.तर काळे-कोल्हे गटाला दिवसा अस्मान दाखवले होते.त्यामुळे नवीन सरकार आल्याने ही निवडणूक जनतेतून होईल असा अंदाज असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कमी पावसाच्या प्रदेशातील नगरपरिषदेच्या निवडणूका संपन्न होणार असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची झोप उडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close