जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डीतील घराणेशाही उलथडवून टाकण्यासाठी १४ ‘मे’ ला संधी-अध्यक्ष कोते

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणूक इतिहासात मोठ्या प्रमाणावर घराणेशाही आढळून येत असून हि घराणेशाही उलथडवून टाकण्यासाठी येत्या १४ मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून परिवर्तन पॅनलला निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन जेष्ठ नेते साई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“या देशात लोकशाहीला घराणेशाहीची मोठी कीड लागली आहे.ती उखडून टाकली तरच सामान्य नागरिक व सभासद यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.अन्यथा सभासदांच्या तोंडाला पाने पुसण्याची शक्यता जास्त आहे.शिर्डी विकास संस्थेत तर काही घरातील संचालक तीन ते चार वेळेस निवडून आले असून त्यांनी आपल्या वारसांना पुढे केले असून आता तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.हि सहकारातील मक्तेदारी मोडून काढण्याची निवडणूक हि संधी आहे”-नितीन शेळके,माजी नगरसेवक शिर्डी नगर परिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूका संपन्न होत असून यात शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.तीची पंचवार्षिक निवडणूक येत्या १४ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व त्यांना राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून त्यांना आव्हान देण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली वीरभद्र परिवर्तन पॅनेल उभा ठाकला आहे.त्यांचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच बिरोबा बन येथे श्री वीरभद्र मंदिरात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते हरिभाऊ भगत हे होते.

सदर प्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त व काँग्रेसचे नेते डॉ.एकनाथ गोंदकर,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,रामराव शेळके,दिलीप कोते,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते,नानासाहेब काटकर,राजेंद्र वाघ,विलास वाघ,रंभाजी बनकर,चांगदेव बनकर,नारायण बनकर,नंदू आबा गोंदकर,भाऊसाहेब कोते,पंडितराव शेळके,भाऊसाहेब शेळके,जगन्नाथ बनकर,अहिलाजी शेळके,राजेंद्र देवराम कोते,उत्तम कोते,गोरक्षनाथ कोते,आप्पासाहेब कोते,बाळासाहेब शेळके,सुभाष कोते,अक्षय राळेकर,सुभाष कोते,गोरक्षनाथ गोंदकर,आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके बोलताना म्हणाले की,”या देशात लोकशाहीला घराणेशाहीची मोठी कीड लागली आहे.ती उखडून टाकली तरच सामान्य नागरिक व सभासद यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.अन्यथा सभासदांच्या तोंडाला पाने पुसण्याची शक्यता जास्त आहे.शिर्डी विकास संस्थेत तर काही घरातील संचालक तीन ते चार वेळेस निवडून आले असून त्यांनी आपल्या वारसांना पुढे केले असून आता तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.हि सहकारातील मक्तेदारी मोडून काढण्याची निवडणूक हि संधी आहे.त्यामुळे सभासदांनी आता या निवडणुकीत क्रांती करणे अभिप्रेत आहे.अन्यथा सभासदांना पच्छाताप करण्याची वेळ येईल असा इशारा त्यांनी देऊन परिवर्तन पॅनलच्या ‘कपबशी’ चिन्हाला मत देण्याचे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी डॉ.एकनाथ गोंदकर,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,रामराव शेळके,दिलीप कोते,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते,नानासाहेब काटकर,राजेंद्र वाघ,आदींनी आपला भूमिका स्पष्ट करून पाठिंबा दिला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी केले आहे.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन कोते यांनी केले तर उपस्थितांचे आभार अड.संदीप गोंदकर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close