निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या वि.का.स.संस्थेची निवडणूक बिनविरोध

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या तेरा संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे.या सर्व उमेदवारांचे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी अभिनंदन केले आहे.
दि.१६ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण २० अर्ज दाखल झाले होते.या पैकी सात उमेदवारांनी आज बुधवारी माघार घेतल्याने उर्वरीत सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवरांचे संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे यांनी आभार व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणाऱ्या संवत्सर सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच सहकार विभागाने मोठ्या उत्साहात संपन्न केली आहे.या संस्थेने शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधी अनेक लाभकारक योजना संस्थेने राबविल्या असून सहकार क्षेत्रात या संस्थेने आपली आगळी- वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून विवेक कृष्णराव परजणे,ज्ञानेश्वर विनायक कासार,सोमनाथ विश्वनाथ घेर,बबन पांडुरंग परजणे,बाळासाहेब गंगाधर बोरनारे,राजेंद्र वसंतराव भोकरे,विठ्ठल घनशाम लोखंडे,बबन सावळेराम भाकरे,महिला गटातून श्रीमती कल्पना अशोक कर्पे,सुरेखा रमेश निरगुडे,इतरमागासवर्ग प्रवर्गातून अविनाश पंढरीनाथ गायकवाड,अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राजेंद्र रामचंद्र तिरमखे,भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून सुभाष नाना डरांगे यांचा समावेश आहे.
दि.१६ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण २० अर्ज दाखल झाले होते.या पैकी सात उमेदवारांनी आज बुधवारी माघार घेतल्याने उर्वरीत सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवरांचे संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे यांनी आभार व्यक्त केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. जी.ठोंबळ यांनी काम पाहिले तर याकामी त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव भानुदास वाकचौरे यांनी सहकार्य केले आहे.
हि निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णराव परजणे,खंडू फेपाळे, लक्ष्मणराव परजणे,लक्ष्मणराव साबळे,सोमनाथ निरगुडे,चंद्रकांत लोखंडे यांच्यासह ग्रामस्थंनी सहकार्य केले. नूतन उमेदवारांचे माजी विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे,राजेश परजणे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.