निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या सोसायटीत सत्तांतर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव विविध सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने बहुमत मिळवून सत्ता मिळविली आहे.
कान्हेगाव विविध सेवा सहकारी सोसायटीची पंच वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत एकूण १३ जागांपैकी ७ जागा जिंकून सत्ता हस्तगत करून देर्डे चांदवड सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर काळे गटाने दुसऱ्या विजयाची नोंद करतांना कान्हेगाव सेवा सोसायटी वर आपला झेंडा रोवला आहे.
यामध्ये काळे गटाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे विजय एकनाथ चौधरी, गोरख सखाराम सांगळे,दीपक भाऊसाहेब भाकरे,सोपान भिकाजी काळे,गोपीनाथ विजय भाकरे,रामदास कारभारी चौधरी,सुनील शिवाजी काजळे यांचा समावेश आहे.बहुमत मिळताच कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे तसेच निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.काळे यांनी अभिनंदन केले आहे.