जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी जाधव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तळेगांवमळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे. त्यात परजणे गटाचे सर्वच्या सर्व ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून संस्थेचे अध्यक्ष म्हणून दत्तात्रय ज्ञानदेव जाधव तर उपाध्यक्ष म्हणून नामदेव मंजाहारी दुपके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तळेगांवमळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागातील एक नावाजलेली संस्था असून ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.ज्ञानदेव दुपके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने शेतकऱ्यांसाठी भरीव स्वरुपाचे योगदान दिलेले आहे.राजकीयदृष्ट्या देखील संस्थेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.गेल्या अनेक वर्षापासून संस्थेवर स्व.नामदेवराव परजणे यांच्या गटाचे वर्चस्व राहिलेले आहे.

यंदाही ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये दत्तात्रय ज्ञानदेव जाधव,नामदेव मंजाहारी दुपके, काशिनाथ भाऊसाहेब दुपके,आसाराम कारभारी दुपके,अशोक नामदेव दुपके,दिलीप वाल्मिक पिंपळे,सोपान गंगाधर उकिरडे,चांगदेव रामा भवर,पोपट किसन पुरी,लिलाबाई काशिनाथ दुपके, इंदुबाई ज्ञानदेव जाधव यांचा समावेश आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सावंत यांनी काम पाहिले आहे. या कामी त्यांना संस्थेचे सचिव साहेबराव निकाळे यांनी सहकार्य केले आहे.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादा दुपके,संजय ज्ञानदेव दुपके, वाल्मिकराव पिंपळे,बाळासाहेब विठ्ठल दुपके,अशोक कडू दुपके,दादासाहेब गंगाधर दुपके, पिरताराम दुपके,बाळासाहेब दगडू दुपके,संजय पांडुरंग टुपके,रघुनाथ दुपके,दिगंबर दुपके, गंगाधर दुपके,दादा सोपान दुपके,गमाजी पवार,अनिल वाकचौरे,अशोक बर्डे,रामजी वैद्य यांनी सहकार्य केले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,खा.डॉ.सुजय विखे,गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close