निवडणूक
..त्यांच्या कारखान्यासारख्या ग्रामपंचायती बिनविरोध करा-मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकारणात अहंम भूमिका वठवणारे काळे-कोल्हे आदी नेते त्यांचे साखर कारखाने वा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्रामपंचायती निवडणुकाही कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बिनविरोध करून द्याव्या अशी महत्वपूर्ण मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्यानंतर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी केली आहे.त्यामुळे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे या मागणीकडे लक्ष लागले असून यावर या नेत्यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांत भांडणे लागून त्यांची वाताहात होते.भावाभावात कायमची भांडणे लागतात.बांदावरून त्याला आणखी तीव्र केले जाते.लग्नकार्याला जाणे बंद होते.कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठतात,अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होतो हे तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने बरोबर नाही.याचा विचार होणे गरजेचे आहे.
कोरोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे.मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी हा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे.या वर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या.त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली.त्यावरूनही राजकारण पेटले होते.प्रकरण कोर्टातही गेले होते.त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता संपन्न होता असून तालुक्यातील स्वहित असलेल्या निवडणुका कोपरगावातील राजकीय नेते बरोबर बिनविरोध पार पाडतात मात्र विकास सोसायटी,ग्रामपंचायतींची वेळ आली की,नेते त्याकडे दुर्लक्ष करतात.या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांत भांडणे लागून त्यांची वाताहात होते.भावाभावात कायमची भांडणे लागतात.बांदावरून त्याला आणखी तीव्र केले जाते.लग्नकार्याला जाणे बंद होते.कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठतात,अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होतो हे तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने बरोबर नाही.याचा विचार होणे गरजेचे आहे.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोल्हे- काळे-परजणे सर्वजण एकत्र येऊन सहकारी (?) साखर कारखाने,दूध संघ,बाजार समिती,बिनविरोध करतात. याठिकाणी आपल्या समर्थकांची नेमणुक करून सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो.मात्र तालुक्यातील अन्य निवडणुकीत घराघरात भांडणे लावून आपापसात झुंज लावून दिल्या जातात.यामध्ये जनतेची फसवणूक करतात.गत तीन बाजार समितीच्या निवडणुकांत सर्वजण एकत्र आले व मिळून सत्ता उपभोगत आहेत.तसेच जर त्यांनी राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,काँग्रेस,आर.पी.आय.,शेतकरी संघटना व आणि सर्वच पक्षाच्या गावागावातील कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना उमेदवारी देऊन तालुक्यातील सध्या होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका कोरोनाचा मोठा धोका असल्याने बिनविरोध कराव्या.पारनेरचे,श्रीरामपूर येथील आमदारांनी आवाहन केले आहे.हि बाब समाधानकारक आहे.याचा बोध तालुक्यातील नेत्यांनी जरूर घ्यावा व दुसऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे बंद करावे असे आवाहन त्यानी केले आहे.पारनेर तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचातीस २५ लाख विकासाकरता देण्याची घोषणा केली आहे.त्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील ही खासदार-आमदार निधी बरोबरच संजीवनी,कोळपेवाडी साखर कारखाने व गोदावरी दूध संघाने बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतच्या गावाच्या विकासाकरता २५ लाखांचा निधी द्यावा अशी मागणी केली आहे.यातून या नेत्याना खरा कळवळा दिसून येईल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेणे,सभा,गाठीभेटी घेणे जिकरीचे होणार आहे.असे शेवटी लक्ष्मण साबळे यांनी शेवटी म्हटले आहे.