जाहिरात-9423439946
निवडणूक

उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी? स्वीकृतसाठी मोर्चेबांधणी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे

   कोपरगाव नगरपरिषद निवडणूकिचा धुरळा खाली बसला असून आता नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले असून माजी नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवकाचे वेध लागले असून उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकाचा विचार होऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.तर स्वीकृत नगरसेवकासाठी कोल्हे गटाकडून माजी नगरसेवक अतुल काले,वैभव गिरमे,पल्लवी दडीयाल आदी नावांची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.तर काळे गटाकडून माजी गटनेते वीरेन बोरावके,बाळासाहेब रुईकर यांची वर्णी लागू शकत असल्याचे बोलले जात आहे.

माजी आ.कोल्हे गटाला आगामी पाच वर्षे शिवसेनेच्या 04 बंडखोरांसह अपक्ष 01 उमेदवार यांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.कारण आधीच आ.आशुतोष काळे गटाने चलाखी दाखवत त्यांना उपनगराध्यक्ष पदासह विविध समित्यांचे पाचही वर्षासाठी गाजर टांगून ठेवले आहे.त्यामुळे कोल्हे गटावर मोठा दबाव तयार होणार हे उघड आहे.परिणामी त्यांचे गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला प्रथम संधी मिळू शकते अशी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.



  कोपरगाव नगरपरिषद निवडणूक संपली असून 21 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निकालात भाजप कोल्हे गटाला नगराध्यक्षपदी पराग संधान यांची वर्णी लागली आहे.तर त्यांच्या वाट्याला 19 जागा आल्या आहेत.यात शिवसेनेने हाती छत्री घेऊन चार जागा वाट्याला आल्या असून एक अपक्ष उमेदवाराला संधी दिली होती.दरम्यान राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाला मागील  07 जागांत भरघोस वाढ होऊन त्या 11 वर पोहचल्या आहेत.त्यामुळे आता दोन्ही गटांना स्वीकृत नगरसेवक निवडीसह सत्ताधारी गटाला उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाचे गळ्यात घालायची असा प्रश्न पडला आहे.त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.उमेदवारी दिनाक 12 जानेवारी प्रसिद्ध होणार आहे.त्यामुळे शुक्रवार दिनाक 09 जानेवारी पर्यंत भरणे अपेक्षित आहे.परिणामी आता उमेवारी भरण्यास अवघा चोवीस तासांचा वेळ उरला आहे.का हा कालावधी 48 तासांचा असतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  

माजी आ.कोल्हे गटाला काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार ओमप्रकाश कोयटे गटाचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक तीन आगामी काळासाठी निर्णायक ठरणार असल्याने पल्लवी बोरावके यांची संधी वाढत आहे.तर प्रभाग क्रमांक एक मध्ये वैभव गिरमे हा त्यांचा महत्वाचा किल्लेदार धारातीर्थी पडल्याने व निवडून आलेले उमेदवार वैभव आढाव हे गावठाण हद्दीतील असल्याने त्यावरही त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार हे उघड आहे.

   प्रचलित निवडणुकीत जे प्रत्यक्ष निवड़णुकीने निवड़ून येत नाही अशा विविध अभ्यासू आणि तज्ञ व्यक्तींना विशेष बाब म्हणून त्याना नगरसेवकपद बहाल केले जाते त्यास स्विकृत नगरसेवक म्हटले जाते.दरम्यान स्वीकृत नगरसेवक नियुक्त करताना सत्ताधाऱ्यांना एकूण नगरसेवक संख्येच्या 10 टक्के किंवा 03 नगरसेवक यापैकी जी संख्या कमी असेल त्यासंख्येपेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.त्यात तज्ज्ञांचीच नियुक्ती करण्याचेही स्पष्ट आहे.त्यात डॉक्टर,वकील,अभियंता,शिक्षण तज्ञ,पर्यावरण तज्ञ,सेवानिवृत प्राध्यापक,मुख्याध्यापक,सहाय्यक आयुक्त,सेवानिवृत मुख्याधिकारी आदींचा समावेश होऊ शकतो मात्र,हे सारे नियम धाब्यावर बसवून आपापल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व निकटवर्तीयांचीच वर्णी लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून हटकून केले जाते हे वारंवार उघड झाले आहे.पूर्वी नगरपालिकांमध्ये बहुमताच्या आधारे स्वीकृत सदस्यांची निवड केली जात होती.पण,राज्य सरकारने स्वीकृत नगरसेवक निवडीचे अधिकार आता लोकनियुक्त नगराध्यक्षांना दिले आहेत.त्यामुळे आता नगरपालिका निवडणूक संपल्यानंतर अनेकांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नगरपालिकेत 02 जण स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढील पाच वर्ष काम करू शकतील.तर विरोधी आ.काळे गटाला 01 स्वीकृत नगरसेवक निवडण्याचे अधिकार मिळणार आहे.त्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.कोणत्या पक्षाच्या कोट्यातून कोण आला आहे,संबंधित निकषात बसतो का,हे स्पष्ट झाल्यानंतर नगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करतील.

  

दरम्यान आ.काळे गटाला आपले सत्ता संतुलन साधण्यासाठी माजी गटनेते वीरेन बोरावके यांचा विचार करणे अभिप्रेत आहे.राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सुनील गंगूले व युवा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव हे इच्छुक असले तरी त्यांना पद असल्याने त्यांचा विचार होण्यास अडचण येऊ शकते असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

  त्या त्या नगरपालिकेच्या एकूण लोकनियुक्त सदस्यसंख्येच्या 10 टक्के किंवा 5 सदस्य यापैकी जी संख्या कमी असेल,तेवढे स्वीकृत सदस्य नगरपालिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांना निर्देशित केले असल्याची माहिती हाती आली आहे.ते करत असताना मान्यताप्राप्त पक्षांचे किंवा नोंदणीकृत गटाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन व अशा प्रत्येक पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्याशी चर्चा करून त्यांचे स्वीकृत सदस्यांचे संख्याबळ निश्चित केले जाईल.स्वीकृत सदस्यत्वासाठी पात्रतेचे निकषही नव्या नियमात निश्चित करण्यात आले आहेत.त्यानुसार वित्तीय क्षेत्र,वैद्यकीय,व्यावसायिक,शिक्षण,अभियंता,वकील,प्रशासकीय सेवा यापैकी एखाद्या क्षेत्राचा किमान पाच वर्षांचा अनुभव असायला हवा.व्यक्ती या क्षेत्रातून निवृत्त झालेली असावी,असे नमूद करण्यात आले आहे.या शिवाय इच्छुक उमेदवार धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या संस्थात किमान पाच वर्षे काम केले असल्याचा अनुभव आवश्यक असल्याची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही गटांकडून कोणाला नामनिर्देशित केले जाणार याकडे शहरातील निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   दरम्यान माजी आ.कोल्हे गटाला आगामी पाच वर्षे शिवसेनेच्या 04 बंडखोरांसह अपक्ष 01 उमेदवार यांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.कारण आधीच आ.आशुतोष काळे गटाने चलाखी दाखवत त्यांना उपनगराध्यक्ष पदासह विविध समित्यांचे पाचही वर्षासाठी गाजर टांगून ठेवले आहे.त्यामुळे कोल्हे गटावर मोठा दबाव तयार होणार हे उघड आहे.परिणामी त्यांचे गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला प्रथम संधी मिळणार असल्याचे बोलले जात असून त्यात विक्रमादित्य सातभाई यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.मात्र पहिल्याच टप्प्यात स्वीकृत नगरसेवक म्हणून सेनेचे अतुल काले यांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे संधी देणे क्रमप्राप्त असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यात बदल होऊन पद्मावती बागुल यांच्या नाव पुढे येऊ शकत असल्याचे बोलले जात आहे.

   दरम्यान या नगरपरिषद निवडणुकीच्या लढाईत कोपरगाव शहरात माळी समाजाला दोन्ही गटाकडून उमेदवारी दिलेले दिपा वैभव गिरमे,पल्लवी दडीयाल (बोरावके) दोन्ही माजी आ.कोल्हे गट आणि डॉ.तुषार गलांडे (आ.काळे गट) आदी तिन्ही उमेदवार धारातीर्थी पडले आहे.त्यामुळे या समाजाची त्यांना संधी मिळावी यासाठी वर्तमानात मोठा दबावगट कार्यरत आहे.त्यांनी आधीच नगराध्यक्ष पदासाठी आपले आरक्षण असूनही आपली आहुती चढवली आहे.याची दोन्ही गटांच्या नेत्याना दखल घ्यावी लागणार हे उघड आहे.त्यामुळे यात दोन्ही नेते एकमताने निर्णय घेऊ शकतात अशी दाट शक्यता आहे.त्यात कोल्हे गटाला काळे गटाचे पराभूत उमेदवार ओमप्रकाश कोयटे गटाचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक तीन आगामी काळासाठी निर्णायक ठरणार असल्याचे त्यांचे एकूण वर्तनातून दिसून येत असल्याने पल्लवी बोरावके यांची संधी वाढत आहे.तर प्रभाग क्रमांक एक मध्ये वैभव गिरमे हा त्यांचा महत्वाचा किल्लेदार धारातीर्थी पडल्याने व निवडून आलेले उमेदवार वैभव आढाव हे गावठाण हद्दीतील असल्याने त्यावरही त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.तर गांधीनगर मधील माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पाठक यांचा विचार कोल्हे गटाला करावा लागणार आहे.आज नगर येथील मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा संपल्यावर रात्री यावर बैठक होऊन चाचपणी होऊ शकते असे चित्र आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान आ.काळे गटाला आपले सत्ता संतुलन साधण्यासाठी माजी गटनेते वीरेन बोरावके यांचा विचार करणे अभिप्रेत आहे.राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सुनील गंगूले व युवा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव हे इच्छुक असले तरी त्यांना पद असल्याने त्यांचा विचार होण्यास अडचण येऊ शकते असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.या शेमीगोंड्याच्या  लढाईत कोण जिंकणार कोण हरणार हे लवकरच दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close