जाहिरात-9423439946
निवडणूक

…या नगराध्यक्षांना पदग्रहण समारंभ होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाचे पराग संधान यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या पदग्रहण समारंभासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचेसह  मान्यवर उपस्थिती राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष पराग संधान.

 

दरम्यान पूर्वी अपक्ष व निष्ठावान भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्यासमोर अण्णा हजारे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यकम घेतला होता.आता यावेळी तब्बल नऊ वर्षांनी पराग संधान यांचे पदग्रहण समारंभाची जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत असून त्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजी संधान व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा ‘सेवा शपथ सोहळा’ संपन्न होत आहे.

    कोपरगाव नगरपरिषद नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाला अनेक वर्षांनी विजय मिळाला असून पहिल्यांदा थेट जनतेतून निवडून येण्यास यश मिळाले आहे.या पूर्वी नगराध्यक्ष एका पक्षाचा तर नगरसेवकांसह बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी घोडा बैल स्थिती नगरपरिषदेत निर्माण होत असे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.आशुतोष काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे हे थोड्या मतांनी पराभूत झाले आहे.तर प्रस्थापित कोल्हे गटाला यात पहिल्यांदा यश आले आहे.त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे दिसून येत आहे.त्याबाबत शहरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार संपन्न झाला असून निवारा परिसरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान व त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार नुकताच संपन्न झाला आहे.

    दरम्यान पूर्वी अपक्ष व निष्ठावान भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्यासमोर अण्णा हजारे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यकम घेतला होता.आता यावेळी तब्बल नऊ वर्षांनी पराग संधान यांचे पदग्रहण समारंभाची जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत असून त्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजी संधान व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा ‘ सेवा शपथ सोहळा’ सोमवार दि.५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता तहसील मैदान,कोपरगांव येथे संपन्न होत आहे.

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे राहणार असून या कार्यक्रमासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष,विविध संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती गटनेते प्रसाद आढाव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close