जाहिरात-9423439946
निवडणूक

नगरपरिषदेत…या गटाची बार्गेनिंग पॉवर वाढणार?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगावात नगरपरिषदेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला असून त्यात भाजप कोल्हे गटाने बाजी मारली असून त्यांना १९ तर आ. आशुतोश काळे गटाने ११ जागा पटकवल्या आहे आणि शिवसेनेने चार आणि अपक्ष (कपबशी) यांनी एक जागा घेऊन आपले निर्णायक स्थान पटकावले असल्याने त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती (बार्गेनिंग) वाढली असल्याने आता ते भाजपकडे उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांसाठी आग्रही राहण्याची शक्यता वाढली आहे.त्यासाठी विरोधी गट त्यांच्या आशा अपेक्षांना खतपाणी घालण्याची शक्यता अधिक असल्याने आगामी काळ सत्तेत आलेल्या भाजपला आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वाढली असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे आणि त्यांचे हितचिंतक जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे असल्याने निधी वाटपात आ.काळे यांचे पारडे जड राहणार हे उघड आहे.शिवाय नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे असल्याने व त्यांच्याच सभेला कोणी आडकाठ्या आणल्या हे स्वतः त्यांनीच जाहीर सभेत सांगितले आहे.परिणामी त्याची किंमत कोल्हे गटाला चुकवावी लागू शकते.

      राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी काल,शनिवारी २० डिसेंबर  मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्याचे निकाल आज सकाळी १०.१५ वाजता येण्यास सुरुवात झाली आहे.व दुपारी ०२ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.त्यात अर्थातच न्यायालयीन प्रक्रियेचा फायदा हा न्यायालयात जाणाऱ्या भाजपला मिळाला असल्याचे उघड झाले असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने त्यांना त्याची भर नंतरच्या काळात भरून काढता आल्याने त्यांच्या जागा वाढून नगराध्यक्ष पद पदरात पाडून घेता आले आहे.तर राष्ट्रवादीला याचा तोटा सहन करावा लागला आहे.

माजी आ.कोल्हे गटाकडे १९ जागांचा फुगवटा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यांना खऱ्या १३-१४ अशा काठावर पास होणाऱ्या जागा मिळाल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत असून शिवसेनेने आलेल्या ०४ जागांनी आपली पत राखली असल्याचे दिसून येत आहे.त्यात आणखी एक अपक्षांची भर पडली असून आगामी काळात त्यांचे वाटाघाटीच्या टेबलवर तडजोड मूल्य (बार्गेनिंग पॉवर)वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्यामुळे आगामी काळात ते त्याचा किती सक्षमतेने वापर करतात त्यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.

   दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या बालेकिल्ल्यात हल्ला करता आला असून तेथील कोयटे यांचे मताधिक्य घटविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यांना मिळालेले मते केवळ ५०० तर त्यांच्या नगरसेवकास मिळालेली मते ०१ हजार ५०० यातच खरी गोम सामावली आहे.शिवाय अपक्ष उमेदवार आकाश वाजे यांना आघाडीत घेऊन त्यांनी आपले दुसरे निर्णायक मताधिक्य वाढवून त्याचे विजयात रुपांतरण केले असल्याचे सरळसरळ दिसून येत आहे.याशिवाय प्रभाग क्रमांक ०७ मध्ये आ.काळे गटाने निराशाजनक कामगिरी केल्याने कोल्हे गटाला अधिकचा बोनस प्राप्त झाला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आपला झेंडा फडकावणे सोपे गेले आहे.

  दरम्यान याआधी कोल्हे गटाने शिवसेनेची छकले करून एक प्रभावी गट आपल्यात सामावून घेऊन त्यांच्याशी आघाडी करून आपल्या विजयाची पायभरणी केली होती.उरलीसुरली शिवसेनेची फुटकळ करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.तीच बाब त्यांनी भाजप निष्ठावान गटाबाबत करून वहाडणे गटास पंगु बनवले होते.मात्र तरीही राजकारणात ४-५ दशके घालणाऱ्या या मंडळींनी योग्य तो बोध न घेतल्याने त्यांच्या हाती धुपाटणे आले आहे.एवढेच नाही तर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि राजेंद्र झावरे यांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही हे विशेष!आता तरी ही मंडळी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बोध घेणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

   दरम्यान आलेल्या निकालात शिवसेनेला एक संधी दडलेली दिसून येत असून कोल्हे गटाकडे १९ जागांचा फुगवटा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यांना खऱ्या १३-१४ अशा काठावर पास होणाऱ्या जागा मिळाल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत असून शिवसेनेने आलेल्या ०४ जागांनी आपली पत राखली असल्याचे दिसून येत आहे.त्यात आणखी एक अपक्षांची भर पडली असून आगामी काळात त्यांचे वाटाघाटीच्या टेबलवर तडजोड मूल्य (बार्गेनिंग पॉवर)वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्यामुळे आगामी काळात ते त्याचा किती सक्षमतेने वापर करतात त्यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.त्यांनी ठरवले तर ते पाचही वर्षे उपनगराध्यक्ष पदासह सर्व विषय समित्या आपल्या ताब्यात ठेवू शकतात.शिवाय या निर्णायक मताचा वापर करून आपले प्रभागासाठी निर्णायक निधी नेऊन आपले बालेकिल्ले बनवू शकतात असे दिसून येत आहे.मात्र हुकमी एक्के कसे वापराचे हे त्याच्यावर अवलंबून राहणार आहे.त्यातच समाधानाची बाब म्हणजे काल लागलेल्या निकालानंतर शिवसेनेचा एक भीष्माचार्याने सूचकपणे संबंधित ईशान्यगडाच्या नेत्यांना आमच्या चार छत्र्या आल्याचा सांगावा अलगतपणे दिला असल्याने आगामी काळात शिवसेनेच्या या भीष्माचार्यांचे पत्ते निर्णायक पडतील असे मानले जात आहे.कदाचित हे विश्लेषण जाहीर होईपर्यंत याचा फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतो आणि त्याचे प्रत्यंतर आगामी काही तासात येऊ शकत असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात नोंदवले जाऊ शकते.त्यामुळे आगामी काळ हा कोल्हे गटाची परीक्षा पाहणारा असणार हे नक्की.

   दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे आणि त्यांचे हितचिंतक जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे असल्याने निधी वाटपात आ.काळे यांचे पारडे जड राहणार हे उघड आहे.शिवाय नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे असल्याने व त्यांच्याच सभेला कोणी आडकाठ्या आणल्या हे स्वतः त्यांनीच जाहीर सभेत सांगितले आहे.परिणामी त्याची किंमत कोल्हे गटाला चुकवावी लागू शकते.पालकमंत्री पदावर मंत्री विखे यांची असलेली मांड त्यांना बऱ्याच अडचणी उभ्या करू शकतात अशी चिन्हे आहे.त्यामुळे शिवसेना आणि अपक्ष यांचा तांडा आगामी काळात आ.काळे यांचेकडे वळला तर आश्चर्य वाटावयास नको इतकेच या निमित्ताने!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close