जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नगरविकास मंत्री कोणती घोषणा करणार,नागरिकांचे लक्ष !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषदेचा प्रचार आज रात्री संपत असताना शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र मुरलीधर झावरे व त्यांचे पंधरा प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहिर सभा आज सायंकाळी 05 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न होत असून या सभेला किती नागरिक उंपस्थित राहणार याकडे शहरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपली पूर्ण तयारी केली असून शहरातील एकूण 69 मतदान केंद्रासाठी 69 मतदान केंद्राधिकारी नेमले असून त्यांच्या दिमतीला पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 414 कर्मचारी सुपूर्त केले आहे.त्यांच्या मतपेट्या तथा मतदान यंत्रे रवाना केली आहे.

   कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.त्यासाठी सर्वच पक्षांनी साम,दाम,दंड भेद आदी आयुधांचा वापर करून मतदारांना आपल्या पारड्यात मते टाकण्यासाठी गळ घातली आहे.शिवाय प्रचार सभेत आरोपांच्या इतक्या फैरी झडल्या की आता मतदारांना कधी एकदा हा प्रचार बंद होतो आणि आपली एकदाची या कचाट्यातून सुटका होते असे झाले होते.सत्ताधारी आणि विरोधक यांनी प्रचार रॅली,सभा,बॅनर,गाड्या,भोंगे आदींचा नुसता गलका केला होता.मात्र आज रात्री या गोंगाटातून मतदार मुक्त होत आहे.आज शेवटचा दिवस साधून शिवसेनेने आपली रणनीती आखून आरोपांना कोणाला उत्तर देता येऊ नये यासाठी ही शेवटची प्रचार सभा आयोजित केली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कामाचा माणूस म्हणून राज्यभर ओळखले जातात.ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शहरातील विकासासाठी काय घोषणा करणार की विरोधकांवर आरोप करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   या जाहीर सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे यांचेसह नगराध्यक्ष पदाचे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेंद्र मुरलीधर झावरे,इरफान शेख आदींनी शेवटी केले आहे.

  दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपली पूर्ण तयारी केली असून शहरातील एकूण 69 मतदान केंद्रासाठी 69 मतदान केंद्राधिकारी नेमले असून त्यांच्या दिमतीला पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 414 कर्मचारी सुपूर्त केले आहे.त्यांच्या मतपेट्या तथा मतदान यंत्रे रवाना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close